Pune Airport Saam tv
मुंबई/पुणे

Pune Airport : पुणे विमानतळावर सोने जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

Pune News : पुणे विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाचे वर्तन अतिशय संशयास्पद दिसून आली. यामुळे त्याने विमानात काही लपवले आहे का? याबाबत विचारणा करण्यात आली

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : पुणे विमानतळावरून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याचे मागील काही महिन्यात झालेल्या कारवाईवरून समोर येत आहे. यातच आता दुबईहून आलेल्या एका पॅकेटमध्ये सोने आढळून आले आहे. तब्बल सोने या कारवाईत सीमा शुल्क विभागाने जप्त केले आहे. 

पुणे विमानतळावर (Pune Airport) दुबईहून आलेल्या एका प्रवाशाचे वर्तन अतिशय संशयास्पद दिसून आली. यामुळे त्याने विमानात काही लपवले आहे का? याबाबत विचारणा करण्यात आली. त्याच्या उत्तरांमुळे संशय आणखी वाढला असल्याने त्याच्या सीटसह विमानातील इतर काही जागा शोधण्यात आल्या. झडती दरम्यान विमानात तो बसलेल्या सीटखाली पाईपमध्ये सोन्याच्या (Gold) पेस्टचे पाकीट लपवून ठेवलेले आढळून आले.  

७८ लाखाचे सोने जप्त 

पुणे (Pune) सीमा शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईत विमानाच्या सीटच्या पानिपत लपवलेले सोने काढल्यानंतर ७८ लाख १ हजार ४३ इतक्या किमतीचे १०८८.३० ग्रॅम वजनाचे २४ कॅरेट सोने मिळून आले. यानंतर सदर व्यक्तीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सीमाशुल्क विभाग करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Umpire Death : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट अंपायरचे ४१ व्या वर्षी निधन, जय शाह यांनी वाहिली श्रद्धांजली

Maharashtra Tourism: माथेरान, महाबळेश्वर विसराल; महाराष्ट्रातील 'हे' स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन पाहिलंत का?

Indigo Airplane : मधमाशांमुळे इंडिगो विमान उड्डाण रखडले, नेमकं काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग

Weight Loss: एका महिन्यात ४-५ किलो वजन कमी करता येतं का?

SCROLL FOR NEXT