Pune Ganapati Festival Saamtv
मुंबई/पुणे

Pune Ganapati Festival: सावधान! ड्रोन उडवाल तर थेट जेलमध्ये जाल; पुण्यात गणेशोत्सव काळात 'ड्रोनबंदी'

Ganeshotsav Pune 2023: पुणे पोलिसांनी याबाबतच्या सुचना दिल्या असून कायदा मोडल्यास थेट जेलची हवा खायला लागणार आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Drone Bane In Pune City:

पुणे शहरात सध्या गणेशोत्सवाचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव काळात होणारी गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीने शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून गणपती काळात शहरात ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहरात (Pune) सध्या गणपती उत्सवाचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळत आहे. शहरातील मानाच्या गणपतींचे तसेच विविध मंडळांच्या बाप्पाचे मोठ्या जल्लोशात आगमन झाले. गणपतीचे (Ganapati Festival 2023) देखावे पाहायला तसेच बाप्पाचे दर्शन घ्यायला भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

याच पाश्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी मोठा निर्णय घेतला असून उत्सव काळात ११ दिवस शहरात ड्रोन तसेच उडणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी याबाबतची सुचना दिल्या असून कायदा मोडल्यास थेट जेलची हवा खायला लागणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या सुचनांनुसार शहरात ११ दिवस ड्रोन, रिमोट कंट्रोल, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरामोटर, हँडग्लायडर, हॉट एअर मायक्रो-लाइट, बलून याचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, उत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीने शहरात १ हजार ८०० सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच गणपती मंडळांनाही परिसरात कॅमेरे बसवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

Commonwealth Games 2026 : भारताच्या लेकींचा गोल्डन पंच; बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जॅस्मिननं जिंकली सुवर्णपदके

Inflation Alert: सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना झटका! डिटर्जंटपासून पेंटपर्यंत 'या' वस्तू होणार महाग

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत वाद; बड्या नेत्याच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी, पक्षात काय घडतयं?

SCROLL FOR NEXT