Floating Hospital In Bhatghar Dam Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात चालवला जातोय तरंगता दवाखाना, तुम्ही पाहिलाय का? कसे केले जातात उपचार?

Floating Hospital In Bhatghar Dam: पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील भाटघर धरणात हा तरंगता दवाखाना सुरु करण्यात आला आहे. या दवाखान्यामुळे धरणाकाठच्या गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांना खूप फायदा होणार आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

तुम्ही आतापर्यंत तरंगता दवाखाना पाहिला आहे का? महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये या तरंगत्या दवाखान्यातून रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील भाटघर धरणात हा तरंगता दवाखाना सुरु करण्यात आला आहे. भोरचे बिडीओ आणि तालुका आधिकिरी यांच्या हस्ते या तरंगत्या दवाखान्याचे पूजन करुन करण्यात आले आणि ते नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.

महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात या तरंगत्या दवाखान्याची सेवा बंद राहते. भोर पंचायत समीतीतर्फे -दरवर्षी आक्टोंबर महिन्यात ही आरोग्य सेवा सुरु केली जाते. भाटघर धरण क्षेत्रातील १६ गावांना या तरंगत्या दवाखान्याचा फायदा होणार आहे. आठवड्यातील बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवशी तरंगता दवाखाना कार्यरत राहणार आहे. या तरंगत्या दवाखान्यामुळे भाटघर धरणाच्या आसपासच्या गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांना याचा चांगला फायदा होईल.

या लाँचद्वारे धरणाच्या पलीकडच्या गावातील रुग्णांची सोय होणार असून आठवड्यातील बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवशी ही लाँच उपलब्ध राहणार आहे. बुधवारी बोपे, कुंबळे, वाघमाची घुमट, सांगवी, डेरे, भुतोंडे या गावांसाठी तर शुक्रवारी गुहिणी, खुलशी, चांदवणे, डेरे, भांड्रवली, मळे, सुतारवाडी, नानवळे असा प्रवास या तरंगत्या दवाखान्याचा राहणार आहे.‌

भोर तालुक्यातील भाटघर धरण क्षेत्रामध्ये अतिदुर्गम परिसर आहे. राज्य सरकारच्या वतीने येथील नागरिकांना उपचारासाठी बाहेरगावी किंवा मोठ्या शहरांमध्ये जाणे शक्य होत नाही. त्यामुळेच येथे दरवर्षी ही लाँचद्वारे आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. पावसाळ्याच्या काळात ही सेवा बंद असते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सेवा सुरू होते. या सेवेत वैद्यकीय पथकामध्ये लाँच ऑपरेटर यांच्यासह डॉक्टर आणि नर्स, शिपाई असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT