Ratnagiri Hapus Saam tv
मुंबई/पुणे

Ratnagiri Hapus : खवय्यांसाठी खुशखबर..रत्नागिरी हापूस दाखल; पुण्याच्या मार्केटमध्ये पहिल्या पेटीला मिळाला इतका दर

Pune News : पुण्यातील मार्केट यार्डमध्ये यंदा एक महिना आधीच आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली. यामुळे आता पुढच्या काही दिवसात आंब्याची आवक अधिक होणार असल्याचे बोलले जात आहे

Rajesh Sonwane

सचिन जाधव 

पुणे : आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. वर्षभरातून एकदा मिळणारा आंबा सर्वांच्याच पसंतीचा असतो. यात हापूस आंबा (Mango) असला तर बात काही औरच. यंदाच्या हंगामातील याच रत्नागिरी हापूसची पहिली पेटी (Pune) पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये दाखल झाली आहे. हंगामातील पहिला आंबा दाखल झाला असून त्याची विधीवत पूजा आज पार पडली असून या आंब्याचा भाव देखील फुटला असून एका आंब्याची किंमत ४३० रुपये आहे.  (Live Marathi News)

आंब्याला पूरक असे वातावरण असल्याने आंबा पेटी दाखल झाली आहे. पावस भागातील शेतकरी सुनील यांनी मार्केट यार्डमधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर हा रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आली. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये यंदा एक महिना आधीच आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली. यामुळे आता पुढच्या काही दिवसात आंब्याची आवक अधिक होणार असल्याचे बोलले जात आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२१ हजाराला विकली पेटी 

मार्केट यार्डमध्ये पहिल्या पेटीचा लिलाव देखील पार पडला आहे. या लिलावात पहिली मानाची आंब्याची पेटी २१ हजार रुपयांना विकली गेली आहे. म्हणजेच एका आंब्याची किंमत ४३० रुपये आहे. बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्यांनी ही मानाची पेटी विकत घेतली असून या पेटीमध्ये चार डझन आंबे आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT