Ajit Pawar Pune  saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: अजित पवार यांचा पुणे जिल्हा बॅंक संचालकपदाचा राजीनामा; कारण काय?

Pune Latest News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी

Ajit Pawar News:

राजकीय वर्तुळातून एक मोठी उडामोड समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या ३२ वर्षांपासून अजित पवार या बॅंकेचे संचालक होते. मात्र सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या व्यापामुळे अजित पवार यांनी हा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra Latest News)

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे जिल्हा बॅंकेच्या (Pune District Bank) संचालकपदाचा आज राजीनामा दिला. गेली 32 वर्ष अजितदादा पवार हे जिल्हा बँकेवर प्रतिनिधित्व करत होते.

मात्र सध्या उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप आणि पक्षाची वाढती जबाबदारी यामुळे त्यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच अजित पवारांनी राजीनामा दिला असला तरी त्यांचे मार्गदर्शन घेत राहू असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवारांना महायुतीत सहभागी होऊन १०० दिवस पुर्ण झाली आहेत. सध्या राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद (NCP Crisis) निवडणूक आयोगासमोर सुरू असून अजित पवारच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा वकिलांनी केला आहे. तसेच सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासमोर पक्षसंघटना मजबुत करण्याचेही मोठे आव्हान आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT