Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: भरधाव थार गाडीने श्वानाला चिरडले, प्राणीप्रेमींचा संताप; चालकाविरोधात गुन्हा दाखल

Pune News: फिर्यादीच्या तक्रारीनुसार कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Accident News:

पुण्यात भरधाव गाडीने धडक दिल्याने श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शशी नारायण भूषण (वय 42) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील साळुंखे विहार सोसायटी, कोंढवा या भागात असलेल्या एका शॉपिंग सेंटरचे विरुद्ध बाजूला सोसायटीमधील "पिंकी" नावाची श्वान झोपली होती. यावेळी काळया रंगाच्या महिन्द्रा थार (एम.एच.१२.यु.एन.७६११) वरील चालकाने गाडी अतिशय बेदरकारपणे चालवून, तिला जोरदार धडक दिली.

या अपघातात ते श्वान गंभीर जखमी झाले आणि काही वेळात तिचा मृत्यू झाला. 19 सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेनंतर प्राणीप्रेमींनी पोलिसात धाव घेतली.

याबाबत शशी नारायण भूषण (वय 42) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. तक्रारीवरून कार चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT