गोपाळ मोटघरे, साम टीव्ही पुणे
देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना पुण्यातून मात्र एक धक्कादायक घटना समोर आलीय. महापालिकेच्या स्वातंत्र्य दिन समारंभात एका दिव्यांग बांधवाने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय चारचाकी वाहनाच्या काच फोडल्या आहेत. या व्यक्तीने त्याचा निषेध नोंदवल्याचं समोर आलंय. आपण या घटनेबाबत सविस्तर जाणून घेवू या.
महापालिका आयुक्तांच्या गाडीच्या काचा फोडल्या
विनायक सोपान ओव्हाळ, असं या दिव्यांग बांधवाचं नाव (Pune News) आहे. ओव्हाळ यांच्या मागण्यांकडे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सातत्याने दुर्लक्ष केलंय. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात महापालिक आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय वाहनाची काच पडून आपला निषेध नोंदवला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात दिव्यांग बांधवानी अचानक राडा घातल्याने महापालिकेतील उपस्थित सर्वांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता.
काय आहे कारण ?
त्यानंतर महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी या दिव्यांग व्यक्तीला (Disabled Person) ताब्यात घेतलं होतं. त्यावा एका खोलीत काही काळ डाबून ठेवलं होतं. विनायक सोपान ओव्हाळ, या दिव्यांग बांधवाने आरोप केलाय की, त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेने रमाई आवास योजनेच्या लाभासाठी डावललं आहे. तसेच शहरात अतिक्रमण कारवाई दरम्यान दिव्यांग बांधवांच्या टपऱ्यांवर महापालिकेने कारवाई केलीय.
पुण्यातील धक्कादायक घटना
याचा निषेध नोंदविण्यासाठी सोपान ओव्हाळ याने स्वातंत्र्यता दिनाच्या (independence day 2024) कार्यक्रमात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय चार चाकी वाहन फोडण्याचा दावा केला आहे. मात्र, या झालेल्या दुर्दैवी प्रकारावर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी मौन बाळगलं आहे. यापुढेही महापालिका दिव्यांग बांधवांना अशाच प्रकारे डावलत असेल तर आम्ही महापालिका आयुक्त शेखर सिंह ( Pimpri Chinchwad Municipal Commissioner) यांचे शासकीय वाहन पुर्णपणे जाळून टाकू. याला सर्वस्व आयुक्त जबाबदार असतील, असा इशारा विनायक ओव्हाळ या दिव्यांग बांधवाने दिलाय.
कोल्हापूरमधील घटना
स्वातंत्र्यदिनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये एका तरूणाने आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात पाणीपुरवठा संस्थेसाठी उभारण्यात आलेल्या सोलार पॅनलची चौकशी करण्याची मागणी त्याने केलीय. सरपंच आणि ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय. कृष्णात भीमराव पाटील, असं या तरूणाचं नाव आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.