Deccan Queen Sinhagad Express  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: मुंबईतील मुसळधार पावसाने पुणेकरांचे हाल, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस रद्द; बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी

Mumbai Heavy Rain Local Train Update: मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द झाल्यामुळे पुणे रेल्वे स्टेशन तसेच एसटी स्टँडवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे| पुणे, ता. ८ जुलै २०२४

मुंबईसह उपनगरात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली असून मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबईमध्ये झालेल्या पावसाचा पुण्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसला असून डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्सप्रेस या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. भांडुप रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याने ठाण्याच्या पुढे रेल्वे मार्ग बंद झाले आहेत. एकीकडे मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल झालेत तर दुसरीकडे मुंबईच्या पावसाचा पुणेकरांनाही मोठा फटका बसला आहे.

मुंबईमधील मुसळधार पावसामुळे पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्सप्रेस या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द झाल्यामुळे पुणे रेल्वे स्टेशन तसेच एसटी स्टँडवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Mumbai Heavy Rain Local Train Update

दरम्यान, मुंबई वगळता इतर ठिकाणी जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक मध्ये कुठला ही बदल करण्यात आला नाही. प्रगती एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. मुंबईला जाणाऱ्या डेक्कन क्विन आणि सिंहगड या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

Kalyan : घरावरील झाड हटवायला वीज खंडीत करण्यासाठी पैशांची मागणी; महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

SCROLL FOR NEXT