Pavana Dam
Pavana Dam Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पवना डॅमवर पिकनिकला गेलेल्या शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू, पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला

साम टिव्ही ब्युरो

>> दिलीप कांबळे

पुणे : पवना धरणाच्या बॅक वॉटर परिसरात एक दुर्देवी घटना आज समोर आली आहे. दुधीवरे या बॅक वॉटर परिसरात बुडून एका 62 वर्षीय शिक्षक पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रेमप्रकाश रोशनलाल भाटिया असे पाण्यात बुडून मयत झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.

दुधीवरे गावाच्या हद्दीतील एका बंगल्यावर भाटिया व इतर मित्रमंडळी राहण्यासाठी आले होते. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते पोहण्यासाठी पवना धरणाच्या पाण्यात गेले होते. तेथेथोड्या अंतरावर पाण्यात दमछाक झाल्याने ते पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस हवालदार विजय गाले यांनी शिवदुर्गच्या पथकाला पाचारण केले. शिवदुर्गच्या पथकाने भाटिया यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: विश्वासू नोकरानेच केला हात साफ! साथीदारांच्या मदतीने तब्बल २१ तोळे सोने लंपास; १२ तासात आरोपी अटकेत

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा खेळ बिघडणार? बंडखोरांनी वाढवलं टेन्शन, महायुतीत पुन्हा धुसफूस

Ghee Benefits : खा तूप येईल रुप; आरोग्यावर होणारे हे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहितीच नसतील

Karnataka Politics: कर्नाटक काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव; भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार, काय आहे प्रकरण?

Today's Marathi News Live : अहमदनगरमध्ये सुजय विखेंची ताकद वाढणार, महायुतीने आखला मास्टर प्लान!

SCROLL FOR NEXT