CNG News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune CNG Price : पुणेकरांच्या खिशाला कात्री; सीएनजी दरात पुन्हा वाढ

सीएनजी धारक वाहकाच्या खिशाला कात्री

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune CNG PNG Price Hike : आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या पुणेकरांना पुन्हा एक महागाईचा नवीन झटका बसणार आहे. कारण, पुण्यात (Pune) सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. 

आजपासून सीएनजीच्या (CNG) दरात एक रुपयांनी वाढ काण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना एक किलो सीएनजीसाठी 92 रुपये मोजावे लागणार आहे. दीड महिन्यानंतर सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी धारक वाहकाच्या खिशाला कात्री बसणार आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने वाहनधारकांनी आपला कल सीएनजी गाड्यांकडे वळवला आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहनं असल्याने सीएनजी गॅसची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग ही सुद्धा दरवाढीची कारणं आहे.

दरम्यान, आता पुन्हा सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना 1 किलो सीएनजीसाठी 92 रुपये मोजावे लागणार आहेत. सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहन धारक तसेच रिक्षा चालकांना फटका बसला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

SCROLL FOR NEXT