Pune News chandrakant patil complaint against ajit pawar to cm eknath shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: अजितदादा-चंद्रकांत पाटलांमध्ये निधीवरून शीतयुद्ध; थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar vs Chandrakant Patil News: अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये निधीवरून शीतयुद्ध रंगल्याची जोरदार चर्चा आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar vs Chandrakant Patil News: अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये निधीवरून शीतयुद्ध रंगल्याची जोरदार चर्चा आहे. कारण 400 कोटी रुपयांच्या विकासकामांना निधी मिळाला नाही, अशी तक्रार पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

गेल्या ३ महिन्यांपासून हा निधी मिळत नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दोन बड्या नेत्यांमधील या राजकारणात जिल्हा प्रशासनालाच मुख्यमंत्र्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची चर्चा आहे. (Latest Marathi News)

विकासकामांच्या या प्रस्तावांना पवारांचा आशीर्वाद नसल्याने, ही कामे प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अजित पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना डावलत एकला चलो रे, अशी भूमिका घेतल्याने पाटील यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

अजित पवार राज्याच्या सत्तेत सहभागी होण्यापूर्वी मे महिन्यात पुणे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. यावेळी सुमारे ४०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीचे इतिवृत्त १ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले.

मात्र, २ जुलैला अजित पवार उपमुख्यमंत्राची शपथ घेत सत्तेत सहभागी झाले. तेव्हापासून ते इतिवृत्त बराच काळ जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीअभावी रखडले आहे. या प्रस्तावांना पवारांचा आशीर्वाद नसल्याने, ही कामे प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे.

दरम्यान, पुण्याच्या पालकमंत्री पदावर अजित पवार (Ajit Pawar) यांची नियुक्ती होणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. दुसरीकडे या पदावर चंद्रकांत पाटील हेच कायम राहावे, यासाठी भाजपचे काही नेते आग्रही आहेत. पुण्याचे पालकमंत्रीपद मिळेपर्यंत कोणत्याही कारभारात ढवळाढवळ करणार नाही, अशी अजितदादांची भूमिका होती.

मात्र, पुण्यातील प्रलंबित विकासकामांना निधी मिळत नाही, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचं म्हणणं आहे. अजित पवार यांच्या दबावामुळेच ती रखडल्याची तक्रार भाजपच्या गोटातून करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करताच मुख्यमंत्र्यांनीही तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांना धारेवर धरल्याची चर्चा आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

SCROLL FOR NEXT