Rupali chakankar  Saam Tv
मुंबई/पुणे

Rupali Chakankar Case: रुपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह कमेंट्स करणं भोवलं, ७ जणांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

Pune Police: रुपाली चाकणकर यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्या या तरुणांमध्ये वकिलांचा देखील समावेश आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (NCP Leader Rupali Chakankar) यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट करणं काही तरुणांना भोवलं आहे. याप्रकरणी पुण्यातील पोलीस ठाण्यात सात तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली चाकणकर यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्या या तरुणांमध्ये वकिलांचा देखील समावेश आहे. पोलीस (Pune Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर यांना फेसबुक लाईव्ह करत असताना वकील विजय कुमार साखरेो आणि नितीन पाटील यांनी आक्षेपार्ह कमेंट्स केल्या होत्या. दुसऱ्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची नाशिकची सभा सुरू असताना एका युट्यूब चॅनलवर देखील धनराज विश्वकर्मा या व्यक्तीने रुपाल चाकणकर यांच्यविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. तर आरपीएम आणि राज वाडे यांनी देखील त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह कमेंट केली होती.

अशाप्रकारे रुपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्या सात जणांविरोधात पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 354 ए, 509 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 अंतर्गत या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या आमदार आणि नेत्यांना आता टार्गेट केले जात आहे. या नेत्यांना धमक्यांचे फोन येत आहेत. तर काही महिला नेत्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत. याप्रकरणी देखील पोलिसांनी गुन्हे दाखल करत तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rasha Thadani: राणी माझ्या मळ्यामंदी..., रवीना टंडनच्या २१ वर्षीय लेकीचं आरस्पानी सौंदर्य, पाहा लेटेस्ट फोटो

मॉर्निंग वॉकला गेलेल्या पत्रकाराची भर रस्त्यात निर्घृण हत्या

Maharashtra News Live Update: शहापूरमधील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकचा निकाल जाहीर

Cancer : तरुणांमध्ये वाढतोय घसा आणि तोंडाचा कॅन्सर, 'ही' लक्षण दुर्लक्ष करणं पडेल महागात पडेल

Vidhan Parishad Candidate: भाजपनंतर ठाकरे सेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा; विधान परिषद निवडणुकीसाठी १० उमेदवार कोणते?

SCROLL FOR NEXT