पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
सूरज लोखंडे आणि प्रिया गदादे पाटील यांच्याविरोधात पोलिसांची कारवाई
पुणे महानगरपालिकेच्या अभ्यासिकेची तोडफोड केल्याचा आरोप
ग्रंथालय तोडफोड प्रकरणात नगरसेवकांसह ११ जणांविरोधात गुन्हा
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या २ नगरसेवकांसह १० ते ११ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पर्वती पोलिसांनी ही कारवाई केली. या सर्वांवर अभ्यासिका आणि ग्रंथालयाची तोडफोड केल्याचा आरोप आहे. सध्या पोलिसांकडून या सर्वांची चौकशी सुरू करत आहे.
पर्वती पोलिस ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवरसेवक सूरज लोखंडे आणि नगरसेविका प्रिया गदादे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर पुणे महानगरपालिकेच्या अभ्यासिका आणि ग्रंथालयात अनधिकृत प्रवेश करून तोडफोड केल्याचा आरोप आहे. त्यांनी केलेल्या तोडफोडीमध्ये अभ्यासिका आणि ग्रंथालयाचे मोठे नुकसान झाले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर अभ्यासिका आणि ग्रंथालयाचे नुकसान करून चोरी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या संमतीशिवाय अभ्यासिका आणि ग्रंथालयात त्यांनी प्रवेश केल्याची तक्रार करण्यात आली होती. घडलेल्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला त्यांनी सर्वांसमक्ष जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात पर्वती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या २ नगरसेवकांसह ११ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पर्वती पोलिस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.