Pune Latest News:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: शासन मान्यता न घेताच भरवली शाळा, पुण्यातील धक्कादायक प्रकार; अध्यक्ष, संचालकांवर गुन्हा

Pune Latest News: या प्रकरणी जिल्हा परिषदेने धडक कारवाई केली असून या स्कूलच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता. २२ जुलै २०२४

पुणे शहरातील उंड्री येथील ईरा एज्युकेशन सोसायटीतर्फे संचालित ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलकडे कोणतीही शासनाची परवानगी नसताना इयत्ता पहिली ते दहावीचे अनधिकृत वर्ग चालविले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शाळेविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील उंड्री येथील ईरा एज्युकेशन सोसायटीतर्फे संचालित ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलकडे कोणतीही शासनाची परवानगी नसताना इयत्ता पहिली ते दहावीचे अनधिकृत वर्ग चालविले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेने धडक कारवाई केली असून या स्कूलच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनधिकृत वर्ग चालविले जाण्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडनंतर पुणे शहरात गुन्हा दाखल झाल्याची ही दुसरी घटना आहे. जिल्हा परिषदेचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी ज्ञानदेव आबाजी खोसे, यांनी ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या आणि संस्थेचे अध्यक्ष जे विकोस्टा (रा. बेंगलोर), संचालक समीर गोरडे (रा. विमाननगर ) यांच्याविरुध्द अनधिकृत शाळा चालविल्याने गुन्हा दाखल करावा अशी फिर्याद दिली आहे.

विद्यार्थ्यांचे दाखले देणे, विद्यार्थ्यांचे मूळ जन्मप्रमाणपत्र अनधिकृतरित्या ताब्यात घेणे, अनधिकृतरित्या जनरल रजिस्टर क्रमांक एकमध्ये नाव नोंदणी करणे, विद्यार्थी उपस्थितीपत्रक बनविणे, शाळेला शासनमान्यता नसताना असल्याचे भासवण्याचे प्रकार या शाळेने केले आहेत. ही शाळा अनधिकृतरित्या सुरू असल्याने शासनास आवश्यक असलेला महसूल बुडून शासनाची फसवणूक केली आहे, असे जिल्हा परिषदेचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

SCROLL FOR NEXT