Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: धक्कादायक! शेतकऱ्याच्या मुलीला शेतामध्येच जीवंत गाडण्याचा प्रयत्न, पुण्यातल्या राजगडमधील घटना; VIDEO व्हायरल

Pune Latest News: पुणे जिल्ह्यातल्या राजगडमध्ये जमिनीच्या वादातून शेतकऱ्याच्या मुलीला त्यांच्याच शेतामध्ये काम करत असताना जीवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

शेतकऱ्याच्या मुलीला त्यांच्याच शेतामध्ये जीवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या राजगड तालुक्यातील कोंढावळे येथे ही घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून मुंबईतील (Mumbai) कुख्यात गुंडाकडून दहशतीचा प्रयत्न करण्यात आला. या गुंडाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलीच्या अंगावर जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून तिला शेतामध्ये गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द येथे ही घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून शेतकर्‍याचा २१ वर्षांच्या मुलीला जेसीबीच्या सहाय्याने शेतात गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हल्ला झालेली तरुणी प्रणाली बबन खोपडे आणि तिची आई कमल बबन खोपडे यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. मात्र वेल्हे पोलिसात अद्यापही कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

तरुणीच्या आईने सांगितले की, मी आणि माझ्या दोन मुली कोंढावळे खुर्द येथील शेतात काम करत होतो. त्यावेळी संभाजी खोपडे आल्यासोबत १५ ते १६ गुंडांना घेऊन आला. त्याने जेसीबी आणि ट्रॅक्टर सोबत आणून ही जमीन माझ्या नावावर झाली असून तुम्ही या जमिनीत थांबू नका असे सांगले. यावेळी माझी मुलगी प्रणालीने विरोध केला. तेव्हा या गुंडांनी तिला जेसीबीने ढकलून देत तिच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न केला.' या घटनेनंतर कमल खोपडे यांनी आपल्या दुसऱ्या मुलीच्या मदतीने प्रणालीच्या अंगावरील माती बाजूला काढून तिचा जीव वाचवला.

याप्रकरणी त्यांनी वेल्हे पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पण याप्रकरणी अद्याप कोणतिही कारवाई केली नाही. या घटनेमध्ये मुंबईतल्या शिवडीतील कुख्यात गुंड उमेश रमेश जयस्वाल उर्फ राजू भैय्या घटनास्थळी उपस्थित होता . त्याने या ठिकाणी दहशत निर्माण करून ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्याचसोबत संबंधित मुलीच्या अंगावर माती टाकून तिला गाडण्याचा प्रयत्न करत दुसर्‍या महिलांना धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे संबंधित महिलेने आपल्या मुलींसोबत पुणे अधिक्षक कार्यालयात धाव घेत तक्रार केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wall Collapse Tragedy : दर्ग्याची भिंत कोसळली; 5 जणांचा मृत्यू,आकडा वाढण्याची भीती

Mangalgad fort : पावसात ट्रेकिंगचा लुटा मनमुराद आनंद, 'मंगळगड' ची एकदा सफर कराच

PAN Card Security : पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखाल? आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचे सोपे उपाय

Maharashtra Live Update: जालन्यातील परतुर तालुक्यातील वाहेगाव श्रीष्टी परिसरात ढगफुटी

Maharashtra Rain Update : छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत ढगफुटी; अनेकांचे संसार रस्त्यावर, बळीराजाच्या डोळ्यातही अश्रू,VIDEO

SCROLL FOR NEXT