Velhe Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: 'साम'च्या बातमीचा दणका, पुण्यात मुलीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा

Velhe Police Station: शेतकऱ्याच्या मुलीला शेतामध्ये जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी पुणे जिल्ह्यातल्या राजगड तालुक्यातील कोंढावळे येथे घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुणे जिल्ह्यातल्या राजगडमध्ये शेतकऱ्याच्या मुलीला जीवंत गाडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच १० ते १२ संशयितांविरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुरूवारी पुणे जिल्ह्यातल्या राजगड तालुक्यातील कोंढावळे येथे ही घटना घडली होती. काही जणांनी जमिनीच्या वादातून शेतकऱ्याच्या मुलीच्या अंगावर जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून तिला शेतामध्ये जीवंत गाडण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीमध्ये जीवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर पध्दतीने ताबा घेण्यासाठी आलेल्या 25 ते 30 जणांनी जेसीबीच्या सहाय्याने या तरुणीच्या अंगावर माती टाकून तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला होता. तरुणीने आपल्या आई आणि बहिणीसह याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी याप्रकरणात कोणतीही कारवाई न केल्यामुळे संबंधित महिलेने आपल्या मुलींसोबत पुणे अधिक्षक कार्यालयात धाव घेत तक्रार केली होती. त्यानंतर रात्री उशिरा वेल्हे पोलिसांनी याप्रकरणात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी प्रणाली बबन खोपडे, तिची आई कमल बबन खोपडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वेल्हे पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिसांनी संभाजी नथू खोपडे, तानाजी नथू खोपडे, बाळू भोरेकर, उमेश रमेश जयस्वाल या ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्याचसोबत या चौघांसोबत घटनास्थळावर आलेल्या 10 ते 12 अनोळखी लोकांवर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, तरुणीच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मी आणि माझ्या दोन मुली कोंढावळे खुर्द येथील शेतात काम करत होतो. त्यावेळी संभाजी खोपडे आल्यासोबत १५ ते १६ जण घेऊन आला होता. त्याने जेसीबी आणि ट्रॅक्टर सोबत आणून ही जमीन माझ्या नावावर झाली असून तुम्ही या जमिनीत थांबू नका असे सांगले. यावेळी माझी मुलगी प्रणालीने विरोध केला होता. तेव्हा या सर्वांनी तिला जेसीबीने ढकलून देत तिच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मी माझ्या दुसऱ्या मुलीच्या मदतीने प्रणालीच्या अंगावरील माती बाजूला काढून तिचा जीव वाचवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पंढरपूर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

Rose : जाणून घ्या गुलाबाचे फूल खाण्याचे ५ फायदे

Hirvi Mirchi Thecha: अस्सल गावरान पद्धतीचा हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा?

Shocking News : मुलीच्या शाळेची फी आणि TC मागायला गेले, संस्थाचालकांकडून बेदम मारहाण; वडिलांचा जागीच मृत्यू

Monsoon Skin Tips: पावसाळ्यात तेलकट त्वचेची समस्या? जाणून घ्या घरच्या घरी वापरता येणारे प्रभावी उपाय

SCROLL FOR NEXT