पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं १०० टक्के भरली आहेत. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार ही धरणात १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ही धरणं काठोकाठ भरल्यामुळे पुणेकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणांमध्ये ३ टक्के जास्त पाणीसाठा जमा झाला आहे.
पुणेकरांना यंदा नवरात्रोत्सवात देवी पावली आहे. नवरात्रोत्सवामध्ये पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं १०० टक्के भरली आहेत. गेल्या ३ महिन्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे पाणी टेन्शन मिटवलं आहे. चारही धरणं मिळून सध्या २९.०६ टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. फक्त पुणे शहरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात देखील चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी धरणं देखील काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे सध्या पुणे जिल्ह्यात सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चार ही धरणं फुल्लं भरली आहेत. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणं १०० टक्के भरली आहेत. पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात देखील गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस पडला. पुणे जिल्ह्यामध्ये २६ धरणं आहेत. या सर्व धरणांपैकी अनेक धरणं १०० टक्के भरली आहेत. फक्त दोन ते तीन धरणं ८० टक्क्यांपेक्षा थोडी जास्त भरली आहेत. आणखी पाऊस पडला तर ही धरणं देखील चांगली भरतील.
दरम्यान, पुण्यामध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी सर्वच धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा सर्वच धरणांमध्ये जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे यावर्षी पुणे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना नवरात्रोत्सवामध्ये देवी पावली असल्याचे म्हटले जात आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचे वर्षभराचे पाणी टेन्शन मिटलं आहे. यंदा चांगला पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा देखील सुखावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.