Pune Police vs Koyta gang Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पोलिसांवर कोयता घेऊन धावला, आता धड चालताही येईना; आरोपींची काय अवस्था झाली एकदा पाहाच

Pune Koyata Gang News : पुण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला असून त्यांना प्रसाद देखील दिलाय.

Satish Daud

मागील काही दिवसांपासून पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगने धुडगूस घालायला सुरुवात केली आहे. दिवसाढवळ्या कोयता गँगचे गुंड वाहनांची तोडफोड तसेच नागरिकांना धमकावत असल्याचं समोर आलंय. या गुंडांचा चांगलाच बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.

अशातच कोयता गँगच्या गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुंडांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात रत्नदीप गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्यात गुंडांनी कोयता हाणला होता. यानंतर दोन्ही गुन्हेगार घटनास्थळावरून पसार झाले होते.

पोलिसांवर कोयता गँगच्या गुंडांनी हल्ला केल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी अवघ्या 12 तासात या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या गुंडांना पोलिसांनी वर्दीचा चांगलाच इंगा दाखवला असून त्यांना प्रसाद देखील दिलाय.

हा प्रसाद इतका गोड होता, की दोन्ही गुंडांना नीट चालता सुद्धा येत नव्हते. सध्या दोन्ही आरोपींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत आरोपींच्या हातात तसेच पायात बेड्या आहेत. त्यांना नीट चालताही येत नाहीये. पोलिसांच्या अंगावर हात टाकल्याने काय स्थिती होते, हेच यामधून दिसून येतंय.

पुण्यात आढळला अनोळखी तरुणीचा मृतदेह

पुण्यातील खराडी परिसरातल्या नदीपात्रात एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या तरुणीची हत्या करून तिचे हात आणि पाय तोडण्यात आले आहेत. तसेच तिचे शीर देखील धडावेगळं करण्यात आलंय. सध्या पोलिसांकडून मृत तरुणीची ओळख पटवणे सुरु असून याप्रकरणी चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT