Dogs Attack and Kill Woman in Chakan Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking: पुणे हादरले! कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, शरीराचे लचके तोडत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

Dogs Attack and Kill Woman in Chakan: रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेवर कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होतोय.

Priya More

Summary:

  • चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

  • आंबेठाण चौकात कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला

  • कुत्र्यांच्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

  • भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रोहिदास गाडगे, शिरूर

पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. चाकण शहरातील आंबेठाण चौकात ही धक्कादायक घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास ६ कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या कुत्र्यांनी त्यांच्या शरीराचे अक्षरश: लचके तोडले. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शोभा विजय वाघमारे असे मृत महिलेचे नाव आहे. त्या मूळच्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी होत्या. सध्या त्या चाकण परिसरात राहत होत्या. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास त्या आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात होत्या. त्याच वेळी सहा भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. महिलेने दगड उचलून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांच्या झुंडीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या हल्ल्याचा थरार कैद झाला आहे.

या हल्ल्यादरम्यान कुत्र्यांनी शोभा यांच्या हात, पाय, तोंड आणि मानेवर चावा घेतला. शरीरावर गंभीर जखमा झाल्याने अतिरक्तस्त्राव होऊन सुमारे १५ मिनिटांतच त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी स्थानिकांना विवस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. सुरुवातीला हत्या किंवा अत्याचाराचा संशय व्यक्त करण्यात येत होता.

मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत पुन्हा एकदा समोर आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT