A tragic incident reported at Rajgad Fort in Pune district after a tourist suffered a fatal heart attack near the Balekilla during trekking. saam tv
मुंबई/पुणे

Pune News: राजगड किल्ला सर करताना आला हृदयविकाराचा झटका; बाल्लेकिल्ल्यावर पर्यटकाचा मृत्यू

Tourist Dies of Heart Attack: पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना बारामती येथील एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना बालेकिल्लाजवळ घडली.

Bharat Jadhav

  • राजगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान ५२ वर्षीय पर्यटकाचा मृत्यू

  • बाल्लेकिल्ला परिसरात हृदयविकाराचा तीव्र झटका

  • मृत व्यक्ती बारामती येथील रहिवासी

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुण्यातील राजगड किल्ल्यावर पर्यटनासठी आलेल्या पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडलीय. ही घटना आज शनिवारी २ वाजता दुपारी घडली. संदीप बाळकृष्ण पवार ( वय ५२, सध्या रा.बारामती मूळ राहणार आरफळ ता. सातारा जिल्हा सातारा ) असे मृताचे नाव आहे.

मयत संदीप पवार हे बारामती येथे खाजगी कंपनीत कार्यरत होते. ते आपल्या कंपनीतील १६ जणांच्या ग्रुपसोबत राजगडावर फिरण्यासाठी आले होते..सकाळी पाली दरवाजा मार्गे राजगडावर चढाई करून आले. यांनतर बाल्लेकिल्ला चढून वर गेल्यांनतर थोडा आराम करुन ते पुन्हा खाली उतरण्यासाठी निघाले असता संदीप यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर पडून बेशुद्ध झाले. सोबतच्या मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी ते उठले नाहीत, ते कोणतीही हालचाल करत नव्हते.

गडावरील पुरातत्व विभागाचे सुरक्षा रक्षक विशाल पिलावरे यांना माहिती मिळताच स्थानिक युवक योगेश दरडीगे, सुरक्षारक्षक आकाश कचरे , वनरक्षक अभिनंदन सोनकांबळे तसेच काही पर्यटकांसह त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संदीप यांचे मित्र आणि स्थानिकांनी स्ट्रेचरवरुन संदीप पवार यांचा मृतदेह गडाच्या पायथ्याला खंडोबा माळावर आणण्यात आला.

वेल्हे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सोमेश राऊत यांनी खाजगी वाहनातून मृतदेह वेल्हे येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात आणला. वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी कुरणकर म्हणाले, संदीप पवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. आज सुट्टी असल्याने ते मित्रांसोबत फिरण्यासाठी राजगडावर आले होते.

स्थानिक मावळा जवान संघटनेचे रामभाऊ राजीवडे म्हणाले की, राजगड तोरणा किल्ल्यावर शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. यातून काही दुर्घटना घडल्यास अत्यावश्यक सेवा वेळेवर पोहचत नाही . यासाठी सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवार आणि रविवार या गडकिल्यांच्या पायथ्याला वैद्यकीय पथके , रुग्णवाहिकांची सोय असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT