Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: दुर्देव! हाैस जीवावर बेतली; भीमा नदीत बुडून २ मुलांचा मृत्यू

या घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Shivani Tichkule

सचिन जाधव

Pune News Today: पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना काल (२१ मे) दुपारच्या सुमारास घडली आहे.अनुराग विजय मांदळे ( वय १६) आणि गौरव गुरुलिंग स्वामी (वय १६) अशी या दोन मुलांची नावे आहेत. (Breaking Marathi News)

अनुराग आणि गौरव रविवारी भीमा नदीत पोहण्यासाठी गेले होते. नदीच्या बंधाऱ्याचे ढापे उघडले असल्याने पाण्याचा प्रवाह सुरू होता. त्या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही पाण्यात बुडाले.

त्यांच्यासोबत पोहणाऱ्या इतर मुलांनी अनुराग आणि गौरवला पाण्यात बुडाल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर शेजारी शेतात काम करणाऱ्या एका व्यक्तीने नदीकाठी धावत घेतली.

त्यांनी या घटनेची माहिती शिक्रापूर पोलीस, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलातील जवानांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक,पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पुणे (Pune) महानगर विकास प्राधिकरणचे अग्नीशमक दलाचे केंद्र अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते. (Pune News)

घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी बुडालेल्या दोन मुलांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली. मात्र, रात्री अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.त्यानंतर पुन्हा आज सकाळपासून पाण्यात बुडालेल्या दोन मुलांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरवात केली. काल सायंकाळपर्यंत दोघांचा ठावठिकाणा लागला नाही. (Latest Marathi News)

अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली होते. मात्र आज सकाळी शोध कार्य सुरु केल्यानंतर गौरव गुरुलिंग स्वामी याचा मृतदेह सापडला आहे. तर दुसऱ्या मुलांचा शोध अद्याप सुरू आहे. या घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Dombivli : केडीएमसी निवडणुकीत भाजपचा दुसरा विजय निश्चित! कार्यकर्त्यांचा जल्लोष

High Cholesterol: जेवण गिळताना त्रास होतोय? कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं तर नाही ना? जाणून घ्या लक्षणं

Maharashtra Live News Update: नागपुरातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचं निधन

Crime: धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकून दिलं

Sunny Deol: वडील धर्मेंद्र यांना शेवट मोठ्या पडद्यावर पाहून सनी देओलला अश्रू अनावर; या अभिनेत्रीने केलं सांत्वन

SCROLL FOR NEXT