Pune Bullet Train Saam tv
मुंबई/पुणे

Pune Bullet Train: गुड न्यूज! पुण्याला मिळणार २ बुलेट ट्रेन, मुंबईकरांनाही होणार फायदा

2 New Bullet Train Announcement For Maharashtra: महाराष्ट्रासाठी दोन बुलेट ट्रेनची घोषणा केली आहे. पुण्याला दोन नवीम बुलेट ट्रेन मिळणार आहे. मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद अशा दोन बुलेट ट्रेन धावणार आहे.

Siddhi Hande

पुण्याला मिळणार २ बुलेट ट्रेन

मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद मार्ग प्रस्ततावित

मुंबई पुणे प्रवास फक्त ४८ तासात

देशातील सर्वात वेगवान धावणारी बुलेट ट्रेन लवकरच सुरु होणार आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन देशात लवकरच धावणार आहे. याचसोबत आता नवीन बुलेट ट्रेनचीही घोषणा केली आहे. सात बुलेट ट्रेन मार्गांचे नियोजन सुरु केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन मार्गांचा समावेश आहे. सध्या मुंबई-पुणे आणि पुणे हैदराबाद अशा दोन मार्गांना प्राधान्य देण्यात आले आहे. या बुलेट ट्रेनचे काम लवकरच सुरु केले जाण्याची शक्यता आहे.

मुंबई पुणे बुलेट ट्रेन (Mumbai Pune Bullet Train)

मुंबई पुणे बुलेट ट्रेन सुरु झाल्यावर प्रवास खूप वेगवान होणार आहे. मुंबई ते पुणे फक्त ४८ मिनिटांत होणार आहे. ही बुलेट ट्रेन औद्योगिक आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. यामुळे तुम्ही १ तासाच्या आत मुंबईहून पुण्याला जाऊ शकणार आहात. रोज मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी ही ट्रेन खूप महत्त्वाची ठरु शकते. १ तासातच तुम्ही पुण्याला पोहचू शकतात.

पुणे हैदराबाद ट्रेन (Pune Hyderabad Bullet Train)

तसेच पुणे ते हैदराबाद या बुलेट ट्रेनमुळे प्रवास खूप सोपा होणार आहे. हा प्रवास फक्त २ तासात होण्याचा अंदाज आहे. यामुळे दोन्ही राज्ये जोडली जाणार आहे. यामुळे औद्योगिक, आयटी क्षेत्राला चालना मिळणार आहे. त्याचसोबत रोजगाराची संधीदेखील निर्माण होणार आहे.

बुलेट ट्रेनच्या कामाचा स्टेट्‍स

बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत समुद्राखालील बोगद्याचे काम सुरु आहे. हा २१ किलोमीटरचा बोगदा असणार आहे. यासाठी पायाभरणी, खांब उभारणे, रुळ टाकणे ही सर्व कामे सुरु झाली आबे. १७ नद्यांवर पूलदेखील बांधले जाणार आहे. यामुळे संपूर्ण देश बुलेट ट्रेनमुळे जोडला जाणार आहे. याचसोबत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भिवंडी हादरली! चिकन शाओर्मा, पिझ्झा खाल्ल्याने १४ जणांना विषबाधा; अचानक उलट्यांचा त्रास अन्...

ट्रम्प झुकले, आखातात शांतता, इराण-अमेरिकेत 'व्हर्साय' करार, य़ुद्धबंदीच्या करारात नेमकं काय?

MLA Convoy Accident: विवाह समारंभातून परतताना आमदाराच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या

Fact Check: E20 पेट्रोल वापराल, विम्याला मुकाल? गाडीचं नुकसान झाल्यास भरपाई नाही?

Maharashtra Monsoon Update: राज्यात आठ दिवस मुसळधार पाऊस; नदी नाल्यांना येणार पूर

SCROLL FOR NEXT