Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident Viral Video : माणुसकी हरपली...! नवले पुलावर ८ जणांनी प्राण सोडले, दुसरीकडे लोक दागिने आणि पैसे गोळा करण्यात गुंग, व्हिडिओ व्हायरल

Pune Navale Bridge Accident Death Viral Video : पुण्यातील नवले पुलावर कंटेनरच्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही नागरिकांनी मृतांच्या व जखमींच्या वस्तू लुटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या अमानुष कृत्यावर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Alisha Khedekar

नवले पुलावर कंटेनरच्या धडकेत ८ जणांचा मृत्यू आणि १५ जखमी

अपघातानंतर नागरिकांचे पैसे व सोन्याची लूट केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर

भीषण अपघातात चारचाकी गाडी आगीत होरपळून चक्काचूर

घटनेने संपूर्ण पुणे हादरले

पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी म्हणजे १३ नोव्हेंबर रोजी भीषण अपघात झाला. कंटेनरवरचा चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पुढे असलेल्या गाड्यांना धडकला. या भीषण अपघातानंतर या गाडीने पेट घेतला. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. त्यानंतर या पुलावर मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. पुणेकरांनी या अपघातादरम्यान रस्त्यावर पडलेले काही पैसे आणि सोनं लुटल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

एकीकडे ८ जणांना मृत्यूने कवटाळलं तर दुसरीकडे पुण्यातील नागरिकांनी अमानुषपणाचा कहर केला. व्हायरल व्हिडिओनुसार, नवले पुलावर अपघात झाल्यानंतर अपघातातील मृतांचे आणि जखमींचे सामान, दागिने, पैसे सर्वत्र पसरले. अपघातादरम्यान मोठ्या प्रमाणावर पुलावर बघ्यांची गर्दी जमली. या पैकी काही जणांनी रस्त्यावर पडलेलं सोनं, पैसे उचलून स्वतःच्या खिशात घातले. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून अमानवी कृत्याचे दर्शन घडते आहे.

पुण्यात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. पुण्यातील कात्रज बोगदा ओलांडल्या नंतर एका कंटेनर चा ब्रेक फेल झाला आणि चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने रस्त्यात येणाऱ्या ८ ते १० वाहनांना धडक दिली. पुढे एका कंटेनरला धडक देण्यापूर्वीच त्याच्या समोर असलेल्या चारचाकी वाहनाला धडक दिल्यामुळे ते वाहन दोन्ही कंटेनरच्या मध्यभागी सापडलं आणि अग्नितांडव झाला.

घटनास्थळी आगीचे लोण दूरपर्यंत पोहचले. तातडीने पोलिसांनी, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र अपघात इतका भयानक होता की मध्यभागी अडकलेल्या चारचाकीचा चक्काचूर झाला होता. व्हायरल झालेल्या या विडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kothimbir Dishes : कोथिंबीरपासून तयार होणाऱ्या ५ अप्रतिम आणि झटपट बनणाऱ्या डिशेस

Suraj Chavan: सूरज चव्हाणने बंगला बांधलाय ते ठिकाण कुठे आहे?

Gold Price: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १० तोळा सोनं ५४०० रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update: तपोवनातील साधुग्राम परिसरातील साफ सफाईला सुरुवात

इंडिगोमुळे इतर विमान कंपन्यांची चांदी, तिकीटांचे दर गगनाला भिडले, ५ हजाराचे तिकीट ५० हजारांवर

SCROLL FOR NEXT