Navale Bridge Accident in Pune Saam
मुंबई/पुणे

नवले पूल अपघातानंतर वाहतूक विभाग खडबडून जागं झालं, घेतला मोठा निर्णय

Navale Bridge Accident in Pune: पुण्यातील नवले पूल परिसरातील अपघातानंतर महामार्हावर मोठा सुरक्षा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक विभागाने मार्ग कायमस्वरूपी बंद करून नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिलंय.

Bhagyashree Kamble

पुण्यातील नवले पूल परिसरात कंटेनर आणि इतर वाहनांचा झालेल्या अपघातानंतर प्रशासन खडबडून जाग झालं. या अपघातात ८ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर वाहतूक विभागाने सुरक्षिततेला प्राधान्य देत या पुलाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भविष्यातील धोके टाळण्यासाठी काही मार्ग कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मानाजीनगरहून महामार्गावर थेट प्रवेश बंद

नऱ्हे गावातील मानाजीनगरकडून येणाऱ्या वाहनांना आता थेट मुंबई बंगळूरू महामार्गावर प्रवेश करता येणार नाही. या मार्गावरून सर्रास वाहनांची घुसखोरी होत असल्यानं वारंवार अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या कारणामुळे हा प्रवेश मार्ग सिमेंट काँक्रीटच्या दुभाजकाद्वारे कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.

आता या बाजूने येणाऱ्या वाहनांना केवळ सर्व्हिस रोडचा वापर करावा लागणार आहे. दरम्यान, अपघाताचा धोका टाळण्यासाठी जांभूळवाडी परिसरातील दोन रस्ते कायमस्वरूपी बंद होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवले पुलाकडून साताऱ्याच्या दिशेनं जाताना, जांभूळवाडी तलावाजवळील हॉटेल आणि लॉज परिसरातील दोन रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाहनांची उलट दिशेने धाव घेत असल्याने अपघाताची शक्यता वाढली होती. यावर कठोर कारवाई करत वाहतूक विभागाने हे दोन्ही रस्ते लोखंडी दुभाजकाद्वारे कायमस्वरूपी बंद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT