नगरपरिषदेच्या प्रचारातही बिबट्याचा धुमाकूळ
निवडणुकीत विकासकामांपेक्षा बिबट्याचा मुद्दा जास्त गाजतोय.
बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत जुन्नर वनपरिक्षेत्रातील 60 जणांचा मृत्यू
ही अंगावर काटा आणणारी बिबट्याची थरारक दृश्य कुठल्या जंगलातली नाही तर उत्तर पुणे जिल्ह्यातील आहेत. बिबट्याच्या या दहशतीमुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरुर तालुक्यात नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण झालयं. ऐन निवडणुकीच्या काळात तर प्रचाराची वेळच बिबट्याच्या दहशतीनं रात्री दहाएवजी संध्याकाळी सातपर्यंत आली आहे. एवढचं नाही तर मतदार प्रचाराला येणाऱ्या उमेदवारांकडे विकास कामे नको तर बिबट्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी उमेदवार करतायत.
दरम्यान बिबट्यांची वाढती संख्या पाहता. बिबट्याच्या प्रजनन नियंत्रणासाठी नसबंदी आणि बिबट्यांचे रेस्क्यू करा, असं मतं शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी मांडलयं. तर माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी बिबट्याची समस्या सोडविण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करुन निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केलाय.
बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत जुन्नर वनपरिक्षेत्रातील 60 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे जुन्नरचा बिबट्या बारामतीत पोहचलाय. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समस्येचे गंभीर्य सभेत मांडलेय. एकूणच निवडणुकीत विकासकामांपेक्षा बिबट्याचा मुद्दा जास्त गाजतोय. प्रचारात बिबट्याचा प्रश्न नंतर निवडून येणाऱ्या उमेदवारांसाठी मोठ आव्हान असणार आहे .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.