pune municipal corporation sealed proerty of bjp leader nilesh rane for pending tax issue Saam TV
मुंबई/पुणे

Nilesh Rane : निलेश राणे यांची डेक्कन परिसरातील मालमत्ता सील, पुणे महापालिकेची कारवाई

पुण्यात अनेकांनी मालमत्ता कर थकवला असून निर्धारित वेळेत कर न भरल्यास थकबाकीदारांवर कारवाई केली जाणार असल्याचे पुणे महापालिकेने आजच्या कृतीतून दाखविले आहे.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune News :

पुणे महापालिकेने (pune municipal corporation) मालमत्ता कर (property tax) न भरल्याने भाजप नेते निलेश राणे (bjp leader nilesh rane) यांची मालमत्ता सील केली आहे. पुणे महापालिकेतून मिळालेल्या माहितीनूसार भाजप नेते निलेश राणेंची तब्बल तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्यातील डेक्कन (Deccan Pune) परिसरात भाजप नेते निलेश राणेंची मालमत्ता आहे. या परिसरातील असलेल्या आर डेक्कन येथील व्यवसायिक जागेचा कर राणेंनी न भरल्याने संबंधित मालमत्ता महापालिकेने सील केली आहे.

भाजप नेते निलेश राणेंच्या मालमत्तेची तब्बल तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची थकबाकी आहे. सध्या महापालिकेकडून कर वसुली केली जात आहे. राणेंच्या मालमत्ता थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आजची कारवाई केली आहे. (Maharashtra News)

पुण्यात अनेकांनी मालमत्ता कर थकवला असून निर्धारित वेळेत कर न भरल्यास थकबाकीदारांवर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेने आजच्या कृतीत दाखविले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

SCROLL FOR NEXT