विद्येचं माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी आता मोकळा श्वास घेणार असल्याचं दिसतंय. कारण पुण्यात अतिक्रमणविरोधात जोरदार धडक कारवाई सुरू आहे. आता शनिवार वाडा आणि लक्ष्मीरोड परिसरात महापालिकेनं तोडक कारवाई केलीय. या कारवाईवरुन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कठोर भूमिका घेतलीय. कोणत्याही दबावाला बळी पडू नका अशी सुचनाच त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. इतकच नाही तर अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवण्यासाठी जो फोन करणार त्याचं नाव फलकावर जाहीर करण्याचा इशाराच आयुक्तांनी दिल्याचं समजतंय.
महापालिकेच्या सभेत अतिक्रमणाच्या मुद्यावरुन आक्रमक होत नगरसेवकांनी आयुक्तांवर टीका केली होती. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमणावरुन भाजप नगरसेवकांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं. शहरातील विविध भागांत डिसेंबर महिन्यातपर्यंत अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू राहणार आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदा अशी मोठी कारवाई होत असून कोणाचाही दबाव नसल्याचं महापौरांनी सांगितलं.
मात्र आता या कारवाईमुळे काही नगरसेवक धास्तावलेत. कारण काही कार्यकर्त्यांच्या दुकानांवरही कारवाई झाली आहे. त्यामुळे ही कारवाई कशी मागे घेता येईल, यासाठी नगरसेवकांमध्ये खलबतं सुरू आहेत. मुळात सर्वच शहरांमध्ये अधिकारी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यासाठी सरसावतात. मात्र नेत्यांच्या चिल्ल्या-पिल्ल्यांचीच अतिक्रमणं वाचवण्यासाठी फोनाफोनी करून दबाव टाकला जातो. आणि तोच झुगारून लावण्यासाठी पुण्याच्या आयुक्तांनी नवा फंडा अवलंबल्यामुळे सर्वांनीच धसका घेतलाय. आणि त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून ही कारवाई विनाअडथळा सुरू असल्याची चर्चा आहे. आता हाच फंडा इतर शहरांमध्येही आयुक्तांनी राबवायला हवा म्हणजे सर्वच शहरं मोकळा श्वास घेऊ शकतीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.