PUNE WATER CUT RETURNS AS PMC ANNOUNCES ALTERNATE-DAY WATER SUPPLY AMID LOW DAM STORAGE Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम, महापालिकेचा मोठा निर्णय

Pune Water Shortage News : पावसाअभावी पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने पुणे महापालिकेने पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Akshay Badve

  • पुण्यात उद्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

  • पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

  • धरणांमधील घटलेल्या पाणीसाठ्यामुळे पाणीकपात लागू

  • महत्त्वाच्या धरणांमध्ये केवळ 57.85 टक्के पाणीसाठा उपलब्ध

राज्यात काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून ऊन सावल्यांचा लपंडाव पाहायला मिळत आहे. दरम्यान २० जुलै नंतर पावसाची शक्यता असून पुढे काही दिवस नागरिकांना उकाड्याला सामोरे जावं लागणार आहे. अशातच आता पुणेकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पुणे महापालिकेने उद्यापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांसाठी पाणीकपात मागे घेण्यात आली होती. मात्र, धरणांमधील समाधानकारक पाणीसाठा न झाल्याने पुन्हा पाणीकपात लागू करण्यात येणार आहे.

यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणांमधील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. हवामान विभागानेही यंदा काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्प १०० टक्के भरत नाही, तोपर्यंत पाणीकपातीची अंमलबजावणी सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पुणे शहरात ९ आणि १० जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम होता. या काळात लाखो वारकरी पुण्यात दाखल होत असल्याने नागरिकांना आणि वारकऱ्यांना पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी महापालिकेने १२ जुलैपर्यंत पाणीकपात स्थगित केली होती. मात्र, आता परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्धा जुलै महिना संपत आला असताना पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये मिळून केवळ ५७.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ७२.८९ टक्के होता. म्हणजेच यंदा धरणांमधील पाणीसाठा सुमारे १५ टक्क्यांनी कमी आहे. सध्या खडकवासला धरणात ९३.३१ टक्के, पानशेतमध्ये ६०.६३ टक्के, वरसगावमध्ये ५५.४१ टक्के आणि टेमघरमध्ये ३९.४३ टक्के पाणीसाठा आहे. विशेषतः टेमघर धरणातील कमी साठ्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही दिवसांत धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. मात्र, तोपर्यंत पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपुरात वाळू फामियांचा तरूणावर जीवघेणा हल्ला

Petrol diesel Rate Today: मिडल ईस्टमधील तणावाचा इंधनावर परिणाम? पेट्रोल, डिझेल आणि CNG दरांबाबत मोठी अपडेट

Ratnagiri Fort : रत्नागिरीतील ऐतिहासिक ठिकाण, पावसाळ्यात मित्रांसोबत 'या' किल्ल्यावर करा भटकंती

Jejuri Accident: विठूरायाच्या भक्तीत तल्लीन, अचानक ट्रकने वारकऱ्यांना चिरडलं; जेजुरी अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या चाहत्यांना मोठा धक्का, 'जेठालाल'चा पत्ता कट?

SCROLL FOR NEXT