Pune Muncipal Corporation Election 2026 Saam tv
मुंबई/पुणे

Pune : 'तुम्ही सतरंज्या उचला, अन् नेत्यांची मुलं...', घराणेशाहीवरुन कार्यकर्ता संतापला ; पुण्यात राजकारण तापलं

Pune Muncipal Corporation Election 2026 News : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उमेदवारीत नेत्यांच्या नातेवाइकांना प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

  • महापालिका निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू

  • पुण्यात घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर

  • उमेदवारीत नेत्यांच्या नातेवाइकांना प्राधान्य दिल्याचा आरोप

  • कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

येत्या २०२६ मधील जानेवारी महिन्यात राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक १५ जानेवारीला होणार असून १६ जानेवारीला त्याचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार फायनल करण्यासाठी मॅरेथॉन बैठकांचे सत्र देखील सुरू केले आहेत. एकीकडे नेते उमेदवार निश्चित करण्यासाठी मुलाखती घेत आहेत तर दुसरीकडे आपली उमेदवारी फायनल व्हावी यासाठी भावी नगरसेवकांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे.

खरं पहिला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून पाहिल्या जातात. मात्र खरंच कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये संधी दिली जाते का?, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा उपस्थित करण्याचं कारण म्हणजे पुणे महापालिका निवडणुकीच्या उमेदवारांच्या रांगेत सामान्य कार्यकर्त्यांच्या पुढे नेत्यांची लाडकी बाळचं जास्त असल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुण्यात ४१ प्रभागांमध्ये १६५ नगरसेवक निवडून जाणार आहेत आणि यामध्ये देखील नेत्यांच्या लाडक्या बाळांनाच जायचं असल्यामुळे कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायचं काम करायचं का? असा संताप्त सवाल सर्वचं राजकीय पक्षातील कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

पक्षासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो मात्र उमेदवारी देण्याची वेळ आली की कार्यकर्ता हा सतरंजी उचलताना दिसतो आणि नेत्याचे लाडकी बाळं ही उमेदवारी घेऊन जातात. मग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना भाषणांमध्ये तरी कशाला कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणता?' असा संतप्त सवाल या कार्यकर्त्यानी विचारला आहे. दरम्यान सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची नावे समोर आली आहे. यामध्ये अनेक नेत्यांच्या घरातीलच मंडळींची नावे आहेत.

पुणे पालिका निवडणुकांतील इच्छुकांची यादी

  • कुणाल टिळक दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा

  • स्वरदा बापट दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून

  • राघवेंद्र मानकर माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा मुलगा

  • रुपेश मोरे माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते वसंत मोरे यांचा मुलगा

  • करण मिसाळ आमदार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा मुलगा

  • हर्षवर्धन मानकर माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा मुलगा

  • सुप्रिया कांबळे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांची कन्या

  • प्रणव धंगेकर शिवसेना महानगरप्रमुख आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा मुलगा

  • सुरेंद्र पठारे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विद्यमान आमदार बापू पठारे यांचा मुलगा

  • प्रियंका शेंडगे माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या कन्या

  • हेमंत बागुल माजी उपमहापौर आणि 6 तर पुणे महानगरपालिकेत नगरसेवक राहिलेल्या आबा बागुल यांचा मुलगा

  • चेतन टिळेकर आमदार भाजपचे विधान परिषदेचे योगेश टिळेकर यांचा भाऊ

  • ईशान तुपे राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांचा मुलगा

  • मयुरेश वांजळे मनसेचे दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांचा मुलगा

  • महेश पुंडे भाजप नेत्या आणि माजी नगरसेविका कालींदा पुंडे यांचा मुलगा

  • गिरीराज सावंत माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा

ही नाव १६ असली तरी इच्छुक उमेदवारांच्या यादीमध्ये कार्यकर्त्यांच्या कितीतरी पुढे हे नाव होती. आता जरी ही नाव १६ असली तरी प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर यामध्ये आणखी काही नावांची भर पडण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे तर दुसरीकडे आपल्या लाडक्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांचे आप्तेष्ट लॉबिंग करत उमेदवारी खेचून आणण्यात यशस्वी ठरत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचाच बळी जातो ही भावना वाढीस लागली आहे हे मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology: एक-दोन नाही तर ४; नवीन वर्षात निर्माण होतील अद्भुत राजयोग, ३ राशींना येणार 'अच्छे दिन'

Ajit Pawar : अजित पवारांनाही तिढे सुटेना; पुण्यातील प्रभाग क्रमांक ३८ चा असा कुठला गुंता आहे?

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच भीमथडी जत्रेला भेट देणार

Christmas Recipe: ओव्हनशिवाय बनवा 10 मिनिटांत होणारी ही' ख्रिसमस स्पेशल रेसिपी

Carrot-Ginger Juice: दररोज गाजर-आल्याचा ज्यूस प्यायल्याने शरीरात होतील 'हे' बदल

SCROLL FOR NEXT