MPSC विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून पुणे शहर बंद पडण्याची टोकाची भूमिका आंदोलकांनी घेतल्यावर यावर उत्तर देण्यासाठी आता पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे. पुणे शहर विद्येचे माहेर आहे. लाखो मुलं शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी येतात. पुण्यात शिकलेले विद्यार्थी ७० टक्के इथे स्थायिक होऊन पुणेकर झाले आहेत. पुणे शहराने विद्यार्थ्यांना कायम मायेची उब दिलीय. आजपर्यंत विद्यार्थ्यांनी देखील पुण्याला त्रास दिला नाही. मात्र, रोहित पवार यांनी शहर बंद पाडण्याचे विधान केलं आहे.
रोहित पवार यांना आव्हान आहे की त्यांनी पुणे बंद पाडून दाखवावे. कॉलेजचे विद्यार्थी पोहचू शकत नाहीत, रुग्ण रुग्णालयात पोहचू शकत नाही. पुणेकर काय आहेत हे आता त्यांना कळेल. विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आले आहेत त्यांनी त्याचं करिअर घडवावे. ज्या पक्षाला राजकीय स्कोर घडवायचा आहे त्यांच्या नादी लागू नये अशी प्रतिक्रिया पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिलीय.
आज जे आंदोलन सुरू आहे ते विद्यार्थी नसावेत असं मला वाटतं. शरद पवार, सुप्रिया सुळे पुण्यात राहतात त्यांना योग्य वाटते आहे का की पुणे शहर बंद पाडणे? असा प्रश्न सुद्धा महापौर यांनी उपस्थित केलाय. विद्यार्थ्यांना भूमिका मांडण्याचा, मागणी करण्याचा अधिकार आहे. पुणेकरांना कुठला ही त्रास होऊ नये एवढाच मुद्दा आहे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.