सचिन जाधव
Pune Crime News : पुणे (Pune) शहरात राज्यभरातील तरुण एमपीएससीची परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. अशाच एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुण्याच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. त्रिभुवन कावले (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्रिभुवन कावले हा जानेवारी २०२१ पासून पुण्यात राहत होता. तो मुळचा जालन्याचा रहिवाशी आहे. पुण्यात तो आपल्या मित्रांसोबत राहत होता. मंगळवारी दुपारी त्याच्या राहत्या खोलीत तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. त्रिभुवनने नैराश्यातून हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, त्रिभुवन कावले या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्रिभुवनने नैराश्याने पाऊल उचलले असून याला कोणी जबाबदार नाही, असे चिठ्ठीत नमूद आहे. या घटने प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.