PUNE MOSHI GARBAGE DUMP COLLAPSE: 14 WORKERS RESCUED, NDRF CONTINUES SEARCH FOR 9 TRAPPED LABOURERS Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पिंपरी-चिंचवड इमारत दुर्घटनेत मोठी अपडेट, ९ कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न

Pune Moshi Building Collapse Update : पुण्यातील मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा डोंगर कोसळून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत जमीनदोस्त झाली. २३ कामगारांपैकी १४ जणांची सुटका करण्यात आली असून नऊ कामगारांच्या शोधासाठी एनडीआरएफ, सैन्य आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

Alisha Khedekar

  • मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा डोंगर कोसळून तीन मजली इमारत जमीनदोस्त

  • दुर्घटनेच्या वेळी २३ कामगार इमारतीत होते

  • एनडीआरएफ आणि सैन्याच्या मदतीने १४ कामगारांची सुखरूप सुटका

  • नऊ कामगारांचा शोध घेण्यासाठी रात्रभर बचावकार्य सुरू

गोपाळ मोटघरे, पुणे

Pune Pimpari Chinchwad Moshi Building Collapse Update Today पुण्यात गेले ८ दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे बुधवारी भीषण दुर्घटना घडली. दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास कचऱ्याचा मोठा डोंगर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या तीन मजली इमारतीवर कोसळला. हजारो टन कचऱ्याच्या भाराखाली इमारत क्षणात जमीनदोस्त झाली आणि त्यामध्ये २३ कामगार अडकले. या ढिगाऱ्यातून १४ कामगारांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले असून उर्वरित कामगार अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान NDRF च्या मदतीने रात्रीचा दिवस करून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मुसळधार पावसामुळे ओढवलेल्या या आपत्तीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

पुण्याला मुसळधार पावसाने चांगल झोडपून काढलं. कुठे पूर स्थिती निर्माण झाली, तर या मुसळधार पावसात अनेक दुर्घटना घडल्या. अशातच पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे बुधवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास कचऱ्याचा मोठा डोंगर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या तीन मजली इमारतीवर कोसळला. या इमारतीत २३ कामगार काम करत होते. हे कामगार त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकले गेले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. काही कामगारांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवला. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर असलेले पाच कामगार तातडीने बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र उर्वरित कामगार कचरा आणि इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल, पोलिस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.

गेले ४८ तास रेस्क्यू ऑपरेशन सुरूच

परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन एनडीआरएफला तातडीने पाचारण करण्यात आले. बचावकार्य सुरू असताना ढिगाऱ्याचे प्रमाण मोठे असल्याने सुरुवातीच्या काही तासांत अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचणे आव्हानात्मक ठरले. त्यानंतर भारतीय सैन्याच्या जवानांची मदत घेण्यात आली. एनडीआरएफ आणि सैन्य दलाच्या संयुक्त पथकांनी रात्रभर शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले. अडकलेल्या कामगारांचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी ढिगाऱ्यात माइक सोडले. त्यातून काही कामगारांचे आवाज ऐकू आल्याने बचाव पथकांना मोठा दिलासा मिळाला. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना श्वास घेण्यास अडचण येऊ नये म्हणून ऑक्सिजनचा पुरवठाही करण्यात आला.

मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?

काल रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचाव मोहिमेत १४ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र आणखी नऊ कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. “बचाव कार्याला वेळ लागला तरी हरकत नाही, मात्र प्रत्येक कामगाराला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे मोशी कचरा डेपोतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून घटनेच्या कारणांचा सखोल तपास करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT