Pune MNS Leader Nilesh Mazire latest Update (Nilesh Mazire Mns/Facebook) SAAM TV
मुंबई/पुणे

मनसैनिकांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच नवा ट्विस्ट; नीलेश माझीरेंची कडक फेसबुक पोस्ट

पुण्यातील मनसेचे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

साम ब्युरो

पुणे: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात उद्या, रविवारी सभा होणार आहे. त्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे पुणे शहराध्यक्ष नीलेश माझीरे यांच्यासह १५ ते २० कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, यात आता नवा ट्विस्ट आला आहे. नीलेश माझीरे यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करून मी वसंत मोरे आणि मनसे सोडणार नसल्याचे स्पष्ट करतानाच, चर्चेला पूर्णविराम दिला आहे. (Pune MNS Leader Nilesh Mazire Facebook Post)

पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांचे समर्थक नीलेश माझीरे यांच्यासह १५ ते २० कार्यकर्ते मनसे सोडणार असून, शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. या चर्चेला स्वतः नीलेश माझीरे यांनी पूर्णविराम दिला आहे. यासंबंधी नीलेश माझीरे यांनी स्वतः फेसबुक पोस्ट शेअर केली असून, मी मनसेतच राहणार असल्याचे सांगितले आहे.

माझीरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''काल रात्रीपासून काही वृत्तवाहिन्यांवर माझ्याविरोधात बातम्या प्रसारित होऊ लागल्या आहेत. मी शिवसेनेत प्रवेश करतो असे दाखवले जात आहे. पण मी फेसबुकद्वारे सर्व महाराष्ट्र सैनिकांना सांगू इच्छितो की, मी काही दिवसांपूर्वी स्वारगेट येथील कबड्डी स्पर्धेनिमित्त गेलो होते. त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते सचिन आहेर आले होते. त्यांना मी पुष्पगुच्छ देतानाचा व्हिडिओ काल रात्रीपासून व्हायरल होत आहे. पण मी शिवसेनेत प्रवेश करत आहे असे कुठेही बोललो नाही. मी वसंत मोरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नाही.''

यावेळी माझीरे यांनी विरोधकांनाही इशारा दिला. माझ्याविरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना सांगतो की मी मनसेतच आहे. विरोधकांनी जास्त लोड घेऊ नये, असा इशाराही माझीरे यांनी दिला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेआधीच शिवसेनेने मोठी राजकीय खेळी खेळली आहे. राज ठाकरे यांच्या सभेआधी मनसेचे दहा ते १५ पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम राज्यातील जनतेला आणि वेगवेगळ्या पक्षांतील कार्यकर्त्यांना आवडत आहे. त्यामुळे शिवसेनेत मनसेसह इतर पक्षांतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रवेश करत आहेत. उद्याही शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सचिन अहीर यांच्या उपस्थितीत मनसेचे पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचेही मोरे यांनी सांगितले.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT