Pune Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता मेट्रो रात्री ११ वाजेपर्यंत राहणार सुरू

Pune Metro New Timetable: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे मेट्रो रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तसेच मेट्रो ट्रांझिट कार्डदेखील देण्यात आले आहे.

Siddhi Hande

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणेकरांचा प्रवास आता आणखी सोयीस्कर होणार आहे. पुणे मेट्रोने रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता रात्री प्रवास करता येणार आहे.

पुणे मेट्रोने आता सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

प्रवाशांना मेट्रोने अधिक सुलभ आणि जलद प्रवास करता यावा, यामुळेच पुणे मेट्रोने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुणे मेट्रोचे 'एक पुणे ट्रांझिट कार्ड' 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी पहिल्या 5000 प्रवाशांसाठी विशेष सवलतीसह उपलब्ध असतील. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सोपा होणार आहे.

या ट्रांझिट कार्डमुळे पुणेकरांच्या पैशांची बचत होणार आहे. नेहमी ११८ रुपयांना असणारे हे कार्ड प्रवाशांना फक्त २० रुपयांत उपलब्ध होणार आहे. यामुळे पुणेकर दिवसभर २० रुपयांत प्रवास करु शकणार आहेत. हे कार्ड घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे तुम्ही हे कार्ड लगेच बनवून घेऊ शकतात.

मेट्रोचे नवीन वेळापत्रक

पीसीएमसी ते स्वारगेट पर्पल लाइन मेट्रोसेवा सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरु असणार आहे. सकाळी ६ ते ८, ११ ते ४ आणि ८ ते रात्री १० वाजेपर्यंत मेट्रो दर १० मिनिटांनी सुरु राहणार आहे. तर रात्री १० ते रात्री ११ वाजेपर्यंत १५ मिनिटांनी मेट्रो सुरु असणार आहे. सकाळी ८ ते ११ गर्दीच्या वेळेत आणि दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत मेट्रो दर ७ मिनिटांनी सोडण्यात येणार आहे.अॅक्वा लाइन वनाझ ते रामवाडी येथेही याचसारखे वेळापत्रक असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT