Pune Metro starts free ‘One Pune Vidyarthi Pass’ scheme for students Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro: खुशखबर! मेट्रोचा मोफत प्रवास; पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांसाठी 'वन पुणे विद्यार्थी पास'

Pune Metro One Pune Vidyarthi Pass: पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी पुणे मेट्रोने एक मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांसाठी "वन पुणे विद्यार्थी पास" योजना सुरू केली आहे.

Bharat Jadhav

  • पुणे मेट्रोने पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी "वन पुणे विद्यार्थी पास" योजना सुरू केली.

  • या योजनेंतर्गत २५ जुलै ते १५ सप्टेंबर दरम्यान मोफत मेट्रो प्रवास मिळणार आहे.

  • KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी मोफत पास मिळवू शकतात.

  • पुणे व पिंपरी-चिंचवड येथील हजारो विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होणार आहे.

Pune Metro: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातील मेट्रोने विद्यार्थ्यांना आता मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे मेट्रोने पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास योजना सुरू केलीय. विद्यार्थ्यांसाठी वन पुणे विद्यार्थी पास योजना सुरू केलीय.

पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ९० पेक्ष्या जास्त आहे.या प्रवासी संख्येमध्ये एक मोठा वाटा विद्यार्थी समूहाचा आहे. शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये लवकरच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होतेय. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी ही खास सवलत सुरू केलीय.

पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. यामधील २९ स्थानके प्रवासी सेवेत दाखल झालीत. पुणे मेट्रो पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एक प्रमुख सार्वजनिक व्यवस्था बनत आहे. २५ जुलै २०२५ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'वन पुणे विद्यार्थी पास कार्ड' (KYC)' पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

११८ रुपयांना (रु १०० + रु १८ - GST) मिळणारे 'विद्यार्थी पास कार्ड' आता या कालावधीत पूर्णपणे मोफत मिळणार आहे. पण हे कार्ड घेतानासोबत किमान २०० रुपयांचा टॉप-अप करणे अनिवार्य असणार आहे. या २०० रुपयांचा कार्ड घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे २०० रुपये टॉप-अप मिळणार आहे. त्यामध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

'विद्यार्थी पास कार्ड' घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुणे मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान दररोज सर्व प्रवासावर ३० % सवलत उपलब्ध असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

पुणे मेट्रोने कोणती नवीन योजना विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे?

पुणे मेट्रोने "वन पुणे विद्यार्थी पास" योजना सुरू केली असून विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे.

मोफत सुविधा कोणत्या कालावधीत उपलब्ध आहे?

ही सुविधा २५ जुलै २०२५ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत उपलब्ध असेल.

कोणते विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात?

पदवीपर्यंत शिक्षण घेणारे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात.

योजना सुरू करण्यामागचा उद्देश काय आहे?

विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करून शैक्षणिक प्रवास सुलभ करणे हा उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT