Maharashtra CM Devendra Fadnavis and Deputy CM Ajit Pawar during the political face-off over the Pune Metro project. Saam Tv
मुंबई/पुणे

पुणे मेट्रोवरून दादा- भाऊ भिडले, मनमोहन सिंहांना पुणे मेट्रोचं श्रेय?

Pune Metro Credit War Between BJP And NCP: पुण्यात मेट्रोच्या श्रेयवादावरून महापालिका निवडणुक चांगलीच रंगलीय... पुणे मेट्रोचं श्रेय नेमकं कुणाचं? फडणवीस आणि अजित पवार नेमकं का आमनेसामने आलेत

Suprim Maskar

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत विकासकामांच्या श्रेयवादावरून महायुतीतील मित्रपक्षच आमनेसामने आलेत... अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय... अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील ट्रॅफिकवरून अजितदादांवर निशाणा साधत....पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं श्रेय भाजपचं असल्याचं अधोरेखित केलं... मात्र पुणे मेट्रोला मंजूरी डॉ. मनमोहन सिंहाच्या काळात मिळाली, असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांचा श्रेयवाद खोडून काढला.

दुसरीकडे मनमोहन सिंहांच्या काळात मेट्रोला मंजुरी मिळालेली तर मग पुण्यात मेट्रो सुरु व्हायला इतकी वर्ष का लागली? असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय...

पुण्यात वाढत्या लोकसंख्येमुळे टॅफिकची समस्या नागरिकांची डोकेदुखी ठरतेय.. अशातच मेट्रो सुविधा पुणेकरांना थोडासा का होईना दिलासा देतेय... त्यामुळे राजकीय पक्षांकडून मेट्रोवरून श्रेयवादाचं राजकारण सुरु आहे... आधीच पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं भाजपपुढे नवं आव्हानं उभं राहिलयं... अशातच भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकीसाठी एकमेकांवर आरोपाचे बाण सोडले जात असल्यानं राज्यातील महायुती सरकारमध्ये सारं काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालयं...त्यामुळे श्रेयवादावरून रंगलेली पुण्याची ही हायहॉल्टेज निवडणुक नेमकं कोण जिंकतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT