Pune Metro News AI Image
मुंबई/पुणे

Pune Metro : गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा! दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो, जाणून घ्या सविस्तर माहिती

Pune Metro Schedule News Update : गणेशोत्सवाच्या काळात पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढणार असून गर्दीच्या वेळेत दर ५ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होणार आहे. १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान सेवा रात्री २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

Akshay Badve, Alisha Khedekar

  • १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान पुणे मेट्रोच्या फेऱ्यांची संख्या वाढणार

  • गर्दीच्या वेळेत दर ५ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होणार

  • १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान मेट्रो सेवा रात्री २ वाजेपर्यंत सुरू राहणार

  • अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाढीव वेळेत विशेष मेट्रो सेवा उपलब्ध राहणार

गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उत्सवाच्या काळात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये आणि भाविकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित व सुखकर व्हावा, यासाठी मेट्रोच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्यासोबतच सेवेच्या वेळेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. जाणून घेऊया कसे असेल नियोजन.

दर ५ मिनिटांनी मेट्रो

१४ ते २५ सप्टेंबरदरम्यान पुणे मेट्रोच्या संपूर्ण मार्गावर गर्दीच्या वेळेत दर ५ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी पुण्यात येणाऱ्या तसेच शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळून मेट्रोच्या माध्यमातून कमी वेळेत इच्छित ठिकाणी पोहोचणे शक्य होणार आहे.

१४ ते २४ सप्टेंबरदरम्यान विशेष सेवा

गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजेच १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान मेट्रो सेवा सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहे. त्यानंतर उत्सवातील गर्दी आणखी वाढत असल्याने १७ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरदरम्यान मेट्रो सेवा मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सवातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी विशेष नियोजन करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकांमुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. ही बाब लक्षात घेऊन सकाळी ६ वाजल्यापासून सुरू झालेली मेट्रो सेवा २६ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.

मेट्रो भाविकांच्या प्रवासाचा महत्त्वाचा आधार

मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवात पुण्यात येणाऱ्या भाविकांसह स्थानिक नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे. विशेषतः विसर्जनाच्या दिवशी सार्वजनिक वाहतुकीवर वाढणारा ताण कमी करण्यास आणि नागरिकांना सुरक्षितपणे प्रवास करण्यास या अतिरिक्त मेट्रो सेवेमुळे मदत होण्याची अपेक्षा आहे. एकूणच, गणेशोत्सवाच्या काळात पुणे मेट्रो भाविकांच्या प्रवासाचा महत्त्वाचा आधार ठरणार असून, वाढीव फेऱ्या आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारी सेवा नागरिकांसाठी मोठी सोय ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : गृहमंत्रालयातील २ अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, FCRA प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती

Cancer : पायात दिसणारी '४ सामान्य लक्षणं असू शकतात कॅन्सरचा संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Pitru Paksha : पितृपक्षात दिसणारे 'हे' ५ संकेत मानले जातात शुभ, पितरांचा मिळतो आशीर्वाद अन् अडथळे होतात दूर

Pradip Purnekar Case: प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येमागं कुणाचा हात? ठाकरेंच्या नेत्याने थेट नाव सांगत केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT