Metro 5 Saam Tv
मुंबई/पुणे

पुणेकरांसाठी Good News! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो या दिवशी होणार सुरू, १२ स्थानकांची नावेही समोर, वाचा

Pune Hinjewadi metro route stations list : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ चा पहिला टप्पा १५ जूनपासून सुरू होणार आहे. कोणती स्थानके असतील? काय तिकीट असेल, याबाबतची माहिती जाणून घ्या..

Namdeo Kumbhar

pune metro line 3 opening date hinjewadi shivajinagar stations list : हिंजवडी-शिवाजीनगर या मार्गावर धावणारी मेट्रो ३ कधी सुरू होणार? असा प्रश्न पुणेकरांना गेल्या कित्येक दिवसांपासून पडलाय. अखेर याचं उत्तर मिळाले आहे. १५ जूनपासून या मार्गावर मेट्रो (Pune Metro Line 3 launch date June 15 Hinjewadi Shivajinagar) धावणार आहे. हिंजवडी-शिवाजीनगर या मार्गावर २३ स्थानके आहेत. यामधील हिंजवडी बाजूकडील १२ स्थानकांवर मेट्रो धावणार आहे. उर्वरित ११ स्थानके ऑक्टोबर २०२६ मध्ये सुरू होतील, असे एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितलेय. मेट्रो लाइन ३ शिवाजीनगरपर्यंत सुरू झाल्यानंतर मेट्रो लाईन १ (पीसीएमसी ते स्वारगेट) आणि लाईन २ (वनाज ते रामवाडी) यांना जोडणी शक्य होईल. या जोन्ही लाईनचा विस्तार केला जात आहे.

पहिल्या टप्प्यात कोणती स्थानके सुरू होणार? list of stations Pune Metro phase 1 Hinjewadi route

मेगापोलिस सोसायटी इन मान, क्वाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज २, विप्रो टेक्नॉलॉजीज फेज २, पॉल इंडिया, शिवाजी चौक, कोर्टयार्ड बाय मॅरियट, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, ऑर्किड हॉटेल, रामनगर.

दुसऱ्या टप्प्यात कोणती स्थानके सुरू होणार?

हाय स्ट्रीट, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंध, यशदा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरबीआय, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, जिल्हा व सत्र न्यायालय.

हिंजवडी ते शिवाजीनगर यादरम्यान धावणारी मेट्रो लाईन ३ ची सेवा ३१ मे पर्यंत पुणेकरांच्या सेवेत येईल, असा अंदाज होता. पण काही कामे शिल्लक राहिल्याने डेडलाइन वाढली. त्यासाठी अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेने मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामकाजाला थोडा उशिर होत आहे, असे PMRDA आयुक्त अभिजित चौधरी यांनी सांगितले. हिंजवडी-शिवाजीनगर ही उन्नत मेट्रो लाईन आहे, याची लांबी २३.२० किमी इतकी आहे. या मेट्रोमुळे पुण्यातील मध्यवर्ती व्यावसायिक क्षेत्र आणि हिंजवडीतील आयटी हब दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. वाहतूक कोंडीत दररोज अडणाऱ्या पुणेकरांना या मेट्रोनंतर मोठा दिलासा मिळणार आहे.

पुण्यातील मेट्रो लाईन ३ टप्प्या टप्प्याने सुरू होईल. त्यातील पहिला टप्पा १५ जूनपर्यंत सुरू होईल. त्यामध्ये हिंजवडीच्या बाजूच्या १२ स्थानकांचा समावेश असेल. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाची संपूर्ण मार्गावर चाचणी यशस्वी झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ११ स्थानके ऑक्टोबरपर्यंत तयार होतील, त्यानंतर संपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू होईल, अशी माहिती चौधरी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT