Pune Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! नवा मेट्रो मार्ग लवकरच होणार सुरू; कुठल्या भागातील वाहतूककोंडी फुटणार?

Pune New Metro Line: पुणेकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो मार्ग येणार आहे. कोंढवा ते येवलेवाडी मार्गावर मेट्रो धावणार आहे. दक्षिण पुण्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

Priya More

Summary -

  • पुणेकरांच्या सेवेत येणार आणखी एक मेट्रोमार्ग

  • शिवाजीनगर ते येवलेवाडी असा २० किमी लांबीचा नवा मेट्रो मार्ग प्रस्तावित

  • दक्षिण पुण्यातील कोंढवा, उंड्री आणि येवलेवाडीकरांना होणार फायदा

  • महामेट्रोमार्फत हा प्रकल्प राबवला जाणार

सचिव जाधव, पुणे

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नवा मेट्रो मार्ग लवकरच पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास सुसाट, गारेगार आणि ट्रॅफिकमुक्त होणार आहे. आता कोंढवा ते येवलेवाडी मार्गावर मेट्रो धावणार आहे. २० किमी लांब मार्गिकेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या मेट्रोचा फयदा दक्षिण पुणेकरांना होणार असून त्याचा प्रवास सुखकारक होणार आहे.

दक्षिण पुण्यातील कोंढवा आणि येवलेवाडी परिसरातील रहिवाशांना लवकरच नवी मेट्रो मिळण्याची शक्यता आहे. शिवाजीनगरपासून ते येवलेवाडीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याच्या सध्या प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सर्व मंजुऱ्या आणि सर्वेक्षण वेळेत पूर्ण झालं तर २०३०-३१ पर्यंत ही मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर ते येवलेवाडी अशी २० किमी लांब उन्नत मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले असल्याची माहिती दिली आहे.

हिंजवडी ते शिवजीनगर २३ किमी लांब मार्गिकेच्या विस्तारीकरणाचा हा एक भाग असणार आहे. हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारली जात आहे. कोंढवा ते येवलेनगर मेट्रोचं काम महामेट्रोच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या मार्गावर एक अतिरिक्त स्परद्वारे एनबीएम ते उंड्री असा विस्तारही केला जाणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला कॅम्प आणि पुलगेट मार्गे जोडण्याचा देखील प्रस्ताव आहे.

महामेट्रोने प्रस्तावित मार्ग हा शिवाजीनगरपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोडण्यात येणार आहे. त्यानंतर हा मार्ग कॅम्प आणि पुलगेट मार्गे कोंढवा आणि येवलेवाडीपर्यंत वाढवला जाणार आहे. ज्योती चौक ते एनआयबीएम जंक्शन आणि पुढे उंड्रीपर्यंत मेट्रो नेण्याचा मानस असणार आहे. साधारण १ किमीवर एक मेट्रो स्टेशन असणार आहे. एकदा का या प्रस्तावाला मंजुरी मिळाली त्यानंतर या मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले जाईल. २०३० ते ३१ पर्यंत ही मेट्रो सुरू करण्यात उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा मेट्रो मार्ग तयार झाल्यानंतर दक्षिण पुणेकरांना देखील मेट्रो प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. त्यांना अगदी कमी वेळात सुसाट आणि गारेगार मेट्रो प्रवास करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : हजारो पायऱ्या चढल्यानंतर दिसतो अद्भूत नजारा, नाशिकमधील' हे' ठिकाण आयुष्यात एकदा तरी पाहा

Jackfruit Seeds Vada Recipe : वटपौर्णिमेला खास बनवा खमंग-कुरकुरीत फणसाच्या बियांचे वडे, एकदा ट्राय करा ही कोकणी रेसिपी

Buldhana : बुलढाण्यात शेतकरी आंदोलन पेटले! रविकांत तुपकरांच्या आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी एसटी बस जाळली

Maharashtra News Live Update: ऑपरेशन टायगरची पुण्यात चर्चा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंसोबत कोणते खासदार, कोणत्या ६ खासदारांनी सोडली साथ? सर्वांची नावं आली समोर

SCROLL FOR NEXT