Pune Ganeshotsav Manache Ganpati Saam TV
मुंबई/पुणे

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Pune Ganeshotsav Manache Ganpati : पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि प्रमुख गणेश मंडळांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळा जाणून घ्या. कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा आणि प्रमुख मंडळांच्या गणेशोत्सवाची संपूर्ण माहिती.

Akshay Badve

Pune Ganpati Pran Pratishtha : गणरायाच्या आगमनासाठी आता पुण्यनगरी सज्ज झालीय. येणाऱ्या गणेश चतुर्थी निमित्त घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेश मंडळ लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी तयार आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाचा बाबतीत म्हणायचं तर मानाचे पाच गणपती आणि इतर प्रमुख गणेश मंडळांची गेल्या अनेक वर्षांपासून वैभवशाली परंपरा. ही परंपरा यावर्षी सुद्धा जपण्यात आलेली आहे.

यावर्षी देखील या सार्वजनिक मंडळांकडून आकर्षक देखावे आणि बाप्पाच्या स्वागतासाठी तयारी पूर्ण केलीय. पाहूया पुण्यातील मानाच्या गणपती आणि इतर प्रमुख मंडळांच्या यावर्षी सादर केलेले देखावे आणि प्राणप्रतिष्ठाच्या वेळा...

मानाचा पहिला गणपती: पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती

देखावा: मानाचा पहिला गणपती उत्सव मंडपात होणार विराजमान

प्राणप्रतिष्ठा: ११.४५ वाजता होणार वेदमूर्ती देवव्रत रेखे गुरुजी यांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: प्रभात बँड, शौर्य, संघर्ष आणि ज्ञानप्रबोधिनी ढोल पथक यांचे होणार वादन

मानाचा दुसरा गणपती: तांबडी जोगेश्वरी

देखावा: मंडळ १३४ व्या वर्षात पदार्पण होणार असून चांदीच्या पालखीत विराजमान होणार श्री जोगेश्वरी गजानन

प्राणप्रतिष्ठा: दुपारी १२.१५ वाजता आळंदी देवस्थान संस्थेचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या हस्ते बाप्पाची होणार प्राणप्रतिष्ठा

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: आढाव बंधूंचे नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, ताल ढोल ताशा पथक, विष्णूनद शंख पथक यांचा निनाद

मानाचा तिसरा गणपती: गुरुजी तालीम मंडळ

देखावा: जगन्नाथ मंदिर

प्राणप्रतिष्ठा: दुपारी १.५० वाजता होईल

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: ढोल ताशा आणि पारंपारिक बँड यांच्या वादनामध्ये होणार श्रींची भव्य मिरवणूक

मानाचा चौथा गणपती: तुळशीबाग गणपती उत्सव मंडळ

देखावा: भव्य ब्रह्मणस्पती मंदिर

प्राणप्रतिष्ठा: श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र चे कोषाध्यक्ष श्री गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: ओम, स्वर्णक्ष आणि वीर हे तीन ढोल ताशा पथकांच्या उपस्थितीत मिरवणूक

मानाचा पाचवा गणपती: केसरीवाडा गणपती

देखावा: ऐतिहासिक केसरीवाड्यात बाप्पा विराजमान होणार

प्राणप्रतिष्ठा: ११.४५ वाजता रौनक रोहित टिळक यांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: बिडवे बंधू यांचा सनई चौघडा, श्रीरंभकलावंत ढोल ताशा पथकांच्या उपस्थितीमध्ये प्रथेप्रमाणे पालखीतून निघणार मिरवणूक

पुण्यातील इतर प्रमुख गणेश मंडळ

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

देखावा: वृंदावनचे प्रेम मंदिर

प्राणप्रतिष्ठा: श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानूजाचार्य श्री राधावल्लभ मंदिराचे अठरावे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज वृंदावन यांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: मयूर रथातून बाप्पाची मूर्ती मुख्य मंदिरातून उत्सव मंदिरात विराजमान होईल. गंधाक्ष ढोल ताशा पथक तसेच मयूर बँड प्रभात बँड आणि दरबार बँड यांचे वादन असेल

अखिल मंडई मंडळ

देखावा: हरिहर मंदिर

प्राणप्रतिष्ठा: दुपारी १२ वाजता डॉ विनय थोरात आणि प्रतिभा थोरात यांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: न्यू गंधर्व बँड पथक आणि इतर ढोल ताशा पथक

हुतात्मा बाबू गेनु मंडळ

देखावा: भव्य सोरटी सोमनाथ मंदिर

प्राणप्रतिष्ठा: सकाळी ११.३० वाजता नागपूर चे प्रसिद्ध उद्योजक तसेच सिने कलाकार निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकते यांच्या हस्ते होणार

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: रुद्रगर्जना, मोरया, नादब्रह्म आणि नुमवि ढोल ताशा पथकांच्या उपस्थित होणार आगमन मिरवणूक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

Maharashtra News Live Update: पुण्यातील जांभूळवाडी येथील पुलावर भीषण अपघात

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT