pune accident  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Breaking news : जेजुरीत भीषण अपघात; हॉटेल मालकासह 8 जणांचा जागीच मृत्यू

pune accident news : पुण्यात भीषण अपघात झाला आहे. बारामतीमधील जेजुरी रस्त्यावर झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झालाय.

मंगेश कचरे

पुण्यातील जेजुरी मोरगाव रस्त्यावर अपघाताची भीषण घटना घडली आहे. जेजुरी रस्त्यावर झालेल्या अपघातात हॉटेल मालकासह ८ जणांचा मृत्यू झाला आहे. हॉटेलच्या बाहेरील बाजूस भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. जेजुरी जवळच हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील जेजुरी मोरगाव रस्त्यावर कार आणि पीक टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात एका महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन मुलांसह पाच जण जखमी झाले आहेत. जेजुरी-मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीसमोर सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघाताने लोकांची एकच धावपळ झाली.

कसा घडला अपघात?

जेजुरीजवळील किर्लोस्कर कंपनीसमोर श्रीराम हॉटेलमध्ये पीकअप टेम्पोमधील साहित्य उतरविण्याचं काम सुरु होतं. जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पीकअप टेम्पोला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात टेम्पोतून साहित्य उतरवणारे हॉटेलचे मालक, कारमधील प्रवासी असे एकूण ८ जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन मुले, एक, महिला व दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

पिकअप टेम्पोला कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे आणि कारमधील तिघे जण जागेवरच ठार झाले. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alia Bhatt Skin Care: आलिया भट्टची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

Vastu Shastra: पिंपळाचे झाड तोडले का जात नाही? जाणून घ्या त्याचं महत्त्व

Jahnavi Killekar Photos : मोहिनीचं मोहात पाडणार सौंदर्य; कातिल नजरने चाहत्यांवर केली जादू

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत मोठा अनर्थ टळला

Malaysia Helicopter Crash : पतंगासारखे हेलकावे खाल्ले अन् हेलिकॉप्टर थेट नदीत कोसळले; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT