Shinde Sena workers stage a protest in Pune amid growing tension within the Mahayuti alliance over seat sharing. Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: पुण्यात महायुतीत धुसफूस, शिंदेसेनेत नाराजीनाट्याला सुरुवात

Pune Mahayuti Seat Sharing Dispute: पुण्यात महायुतीत चांगलीच धुसफूस पाहायला मिळतयं...जागावाटपात भाजपनं शिंदेसेनेला सन्मानजनक जागा देण्याऐवजी वेगळीच रणनीती आखल्यानं शिंदेसेनेत अस्वस्थता आहे... मात्र याचं जागावाटपामुळे शिंदेसेनेतही नाराजी नाट्य सुरु झालयं.. पुण्यात महायुतीत नेमकं काय घडतयं?

Suprim Maskar

पुण्यात शिंदेसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि संतप्त कार्यकर्त्यांनी थेट विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हेंच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनाला कारण ठरल ते जागावाटपात पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सुरु असणारी मनमानी... पुण्यात शिंदेसेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या घरी जागावाटपासंदर्भात बैठक झाली... मात्र याचं बैठकीतून शहर प्रमुख आणि महानगर प्रमुखांना डावलल्यानं कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला.

पुण्यात शिंदेसेनेत अंतर्गत संवाद आणि योग्य समन्वय नसल्याचं पक्षकार्यकर्त्यांच म्हणणं आहे. शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संर्दभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही भेट घेतलीय..

2017 च्या निकालानुसार, पुण्यात भाजपचे 97, शिवसेना 10, काँग्रेसचे 9, राष्ट्रवादी काँग्रेसचे 39, तर मनसे 2 नगरसेवक निवडून आले होते... त्यामुळे जागावाटपात भाजपचं मोठा भाऊ ठरणार असल्याचं निश्चित आहे...भाजपला पुण्यात स्वतंत्र 125 जागा जिंकायच्या असल्यान भाजपनं अवघ्या 15 जागांचा प्रस्ताव शिंदेसेनेला दिलाय. आणि शिंदेसेनेला मात्र 35 ते 40 जागा हव्या आहेत. शिंदेसेनेला मागणीनुसार जागा न मिळत नसल्यानं शिंदेसेनेतील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत...

दुसरीकडे भाजपनं पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी पहिली अंतिम यादी तयारी केल्याचीही चर्चा आहे...त्यामुळे युतीतील जागावाटपाआधीच भाजपनं महापालिकेसाठी पहिली अंतिम यादी तयार केल्यानं शिंदेसेनेत अवस्थता वाढत चाललीय... आता एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांची ही नाराजी कशी दूर करतात.. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसची 'वंचित'ला निवडणुकीसाठी साद; प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार? VIDEO

भारतातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी? कारण काय? VIDEO

Saturday Horoscope : येत्या काही दिवसांत मोठं काही तरी घडणार; 5 राशींच्या लोकांचे आयुष्य आनंदाने फुलून जाणार

Pune Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली? पुण्यात नेमकं काय घडलं?

Syria Masjid Blast : मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 12 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT