Pune API Krushna Babar ACB Caught Red Handed Bribe Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Bribe Case : पुण्यात API ला २,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा सापडला जाळ्यात

Pune Bribe Case : लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील API कृष्णा बाबर यांच्यावर ₹२.५० लाख लाचेची मागणी केल्याप्रकरणी कारवाई. पुणे ACBने सापळा रचून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

Alisha Khedekar

  • पुण्यातील पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

  • ACBने सापळा रचून लाच स्वीकारताना संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली.

  • API कृष्णा बाबर यांच्यावर ₹२.५० लाख लाचेची मागणी केल्याचा आरोप

सागर आव्हाड, पुणे

खाकी वर्दीतील पोलीस हे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी असतात. मात्र याच वर्दीच्या आडून एका पोलीस अधिकाऱ्याने लाच घेतल्याची संतापजनक घटना घडली आहे. एका गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेत मदत करण्याच्या मोबदल्यात २,५०,००० रुपयांची मागणी केल्याच्या गुन्ह्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) कृष्णा बाबर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासाशी संबंधित प्रकरणात आरोपीचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी तसेच प्रकरणात मदत करण्याच्या बदल्यात API कृष्णा बाबर यांनी आरोपीच्या नातेवाईकाकडे २,५०,००० रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. यानंतर संबंधित व्यक्तीने पुणे ACB कार्यालयाशी संपर्क साधून याबाबत तक्रार दाखल केली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर ACB अधिकाऱ्यांनी प्रकरणाची प्राथमिक पडताळणी सुरू केली. लाचेची मागणी झाल्याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली. पडताळणीदरम्यान तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला पकडण्यासाठी सापळ्याची तयारी करण्यात आली.

ठरलेल्या नियोजनानुसार तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी गेला. त्यावेळी API कृष्णा बाबर यांनी ती रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या ACBच्या पथकाने तत्काळ कारवाई करत त्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यावरच लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई झाल्याने लोणी काळभोरसह पुणे परिसरातील पोलीस वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईमुळे संबंधित विभागाचेही लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. दरम्यान, या प्रकरणात ACBकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील अधिकृत माहिती आणि पुढील कारवाई स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT