LOHAGAD MURDER CASE: SIA GOYAL'S BROTHER UNDER SCANNER AS KETAN AGRAWAL'S FATHER RAISES FRESH SUSPICIONS saam tv
मुंबई/पुणे

सिया-चेतनच्या प्लॅनमध्ये आणखी एकाचा समावेश; वडिलांच्या संशयानंतर होणार सियाच्या भावाची चौकशी

Ketan Agrawal Death Case: लोहगड हत्या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. केतन अग्रवालच्या हत्येच्या कटाबद्दल सिया गोयलच्या भावाला माहिती असावी,असा संशय विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

Bharat Jadhav

  • सियाच्या भावाचाही सहभाग असल्याचा संशय केतनच्या वडिलांनी व्यक्त केलाय

  • साहिल गोयल आणि चेतन चौधरी हे जवळचे मित्र असल्याचा दावा करण्यात आला.

  • संशयाच्या पार्श्वभूमीवर सियाच्या भावाची पोलिसांकडून चौकशी

पुण्यातील लोहगड हत्या प्रकरणामध्ये मयत केतन अग्रवालच्या वडिलांनी आता नवा संशय व्यक्त केलाय. केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणात आणखी एकाची एंट्री झाली आहे. सिया आणि चेतनच्या प्लॅनमध्ये सियाचा भाऊचाही समावेश होता, असा संशय केतनचे वडील यांनी व्यक्त केला, त्यानंतर आता त्याचीही चौकशी होणार आहे. सियाचा भाऊ साहिल आणि तिचा बॉयफ्रेंड हे खास मित्र होते, त्यामुळे केतनच्या हत्येचा प्लॅन आणखी काही जणांना माहिती असण्याचा संशय आहे, असं विशाल अग्रवाल म्हणालेत.

विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केतनच्या वडिलांनी केली होती, ती मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. पुण्यातील लोहगडवर उद्योगपती असलेल्या केतन अग्रवालची 18 जून रोजी हत्या झाली होती.

केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी त्याला गडावरून ढकलून देऊन हत्या केल्याची बाब उघडकीस आलं. या प्रकरणात आता सियाच्या भावाची, म्हणजे साहिल गोयलची चौकशी करण्यात येत आहे. केतनच्या हत्या प्रकरणात सिया आणि चेतन यांच्याबरोबरच अजून काही लोकांचा हात असण्याची शक्यता विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

विग लावायचा हे हत्येचं कारण नाही - विशाल अग्रवाल

केतन डोक्याला विग वापरायचा ही माहिती लग्नाच्या आधी सियाला आणि तिच्या कुटुंबाला देण्यात आली होती. परंतु हत्या करण्याचं हे काही कारण असू शकत नाही, असं विशाल अग्रवाल म्हणाले. लग्नासाठी नकार देणं हे सियासाठी खूप सोपं होतं, पण त्यासाठी तिने केतनची हत्या करण्याची गरज नव्हती, असं विशाल अग्रवाल म्हणाले. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता आणखी काही लोकांची चौकशी करण्यात येत आहे. सियाचा भाऊ साहिल याचीही चौकशी होतेय. साहिल आणि आरोपी चेतन चौधरी हे खास मित्र असल्याने या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश असावा , असा संशय विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : उंदरांनी कुरतडलेली फळे विक्रीला? व्हायरल व्हिडिओने मुंबईकरांमध्ये खळबळ

फिफा वर्ल्डकप 2026चा 'ग्रँड फिनाले', स्पेनसमोर मेस्सीच्या अर्जेंटिनाचं तगडं आव्हान

सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश, 20 जुलैला भारताचं दुसरं स्वातंत्र्य आंदोलन, मोदी सरकारचं टेंशन वाढलं

वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पंढरपूरमध्ये यंदा वारीत ‘एअर ॲम्बुलन्स’, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही : एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT