BREAKING Pune | व्यापाऱ्यांच्या घंटानाद आंदोलनाला सुरुवात, सरकार निर्बंध शिथील करणार?... (पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

BREAKING Pune | व्यापाऱ्यांच्या घंटानाद आंदोलनाला सुरुवात, सरकार निर्बंध शिथील करणार?... (पहा व्हिडिओ)

पुण्यामध्ये व्यापारी महासंघाने जागोजागी घंटानाद आंदोलनाला आजपासून सुरूवात केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पुण्यामध्ये Pune व्यापारी dealer महासंघाने जागोजागी घंटानाद आंदोलनाला आजपासून सुरूवात केली आहे. लॉकडाऊन LockDown मध्ये निर्बंध restraint शिथिल करून, शहरामधील दुकानांची वेळ वाढून देण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी यातून सरकारचे government लक्ष वेधणार आहेत. शहरामधील कोरोना Corona परिस्थितीत मागील ४ महिन्यांपासून नियंत्रणात येत आहे.

रूग्णसंख्या सातत्याने कमी झालेली असताना देखील सरकारने व्यवसायांच्या वेळेमध्ये कोणताही प्रकारचा बदल केला नाही़. यामुळे झोपेच सोंग घेतलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी आणि व्यापारी वर्गाला योग्य न्याय मिळावे. याकरिता शहरामधील सर्व व्यापारी विविध ठिकाणी दुपारी घंटानाद आंदोलनाला सुरुवात केली आहे.

पहा व्हिडिओ-

उद्यापासून पुणे शहरात सर्व दुकाने ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येणार आहेत. यावेळी आम्हाला अटक करून, आमच्यावर पोलीस कारवाई झाली असली. तरी आम्ही त्याला सामोरे जाण्यास तयार असल्याची भूमिका शहरामधील व्यापाऱ्यांनी यावेळी घेतली आहे. रविवारी व्यापारी महासंघाने पत्रकार परिषद घेतली होती. यानंतर सरकारला निर्णयाकरिता २ दिवसांची मुदत देण्यात आली होती.

नाहीतर बुधवारपासून दुकाने ७ पर्यंत उघडी ठेवणार आहे,असा इशारा व्यापाऱ्यांनी यावेळी दिला आहे. अजून देखील सरकारने व्यापाऱ्यांच्या मागणीची दाखल घेतली नाही. तर हे आंदोलन मोठ्या स्वरूपात करण्यात येणार आहे. दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ५ एप्रिल दिवशी राज्य सरकारने पुणे शहरामधील जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजार पेठेमधील इतर सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली होती.

मात्र, आता ४ महिने उलटून गेले आहे. तरी देखील यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही़. एकीकडे बाजारपेठा सोडून सर्व गोष्टी चालू राहत आहेत. राजकीय सभा, समारंभ, आमदारांच्या MLA मुलांचे शाही विवाह असे कार्यक्रम होत आहेत. परंतु, दुसरीकडे व्यापारी वर्गालाच लॉकडाऊनचे नियम लावले जात आहेत.

यामुळे व्यापारी वर्गात मोठा असंतोष पसरत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी, वेळेत वाढ करण्याबाबत १५ दिवसांअगोदर व्यापाऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी यावेळी केलेली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Veg Non Veg Label: शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणवर येणार व्हेज, नॉन व्हेजच लेबल; सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी, नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल

Wednesday Horoscope : अडथळे दूर होतील, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

SCROLL FOR NEXT