Pune Koyta Gang News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यात पुन्हा कोयता गँगच्या गुंडांची दहशत; भररस्त्यात तरुणाला मारहाण, १४ हजारांची रोकड लुटली

Pune Koyta Gang News : कोयत्याचा धाव दाखवून गुंडांनी तरुणाची १४ हजार रुपयांची रोकड देखील लुटून नेली. हा धक्कादायक प्रकार गुलटेकडी भागातील मीनाताई ठाकरे वसाहतीत घडला.

Satish Daud

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगच्या गुंडांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून कोयता गँगच्या गुंडांनी एका तरुणाला भररस्त्यात मारहाण केली आहे. इतकंच नाही तर, कोयत्याचा धाव दाखवून गुंडांनी तरुणाची १४ हजार रुपयांची रोकड देखील लुटून नेली. हा धक्कादायक प्रकार गुलटेकडी भागातील मीनाताई ठाकरे वसाहतीत घडला.

याप्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी (Police) दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय.अमन शाकीर शेख (वय १९, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) आणि त्याच्या साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या पोलिसांकडून दोन्ही आरोपींचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा मीनाताई ठाकरे वसाहतीमधील एकदिल मित्रमंडळाजवळ आला होता. यावेळी दोन्ही आरोपींनी त्याची वाट अडवली. तसेच शिवीगाळ (Crime) करत त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याला मारहाण केली.

एवढ्यावरच न थांबता आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून तरुणाच्या खिशातील १४ हजार रुपयांची रोकड लुटली. या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करताना आरोपींनी कोयत्याने तरुणाचा मोबाइल देखील फोडला. तरुणाने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले.

त्यावेळी आरोपींनी कोयते उगारून परिसरात दहशत निर्माण केली. तसेच घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर तक्रारदार तरुणाने थेट पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संपूर्ण घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT