Water Shortage Saam tv
मुंबई/पुणे

Water Shortage : खेडमध्ये अजबच पाणी टंचाई, २ हंडे मोफत पाणी, तिसऱ्यासाठी द्यावे लागतात पैसे

Pune Khed Village Water Shortage: खेड तालुक्यातील पडसुल गावात पाणी टंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे. या गावात फक्त दोन हंडे पाणी मिळमार आहे. तिसऱ्या हंड्यासाठी १०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

Siddhi Hande

उन्हाळा लागला कि डोंगरमाळरानावर खडतर वाट काढत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा संघर्ष सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाई आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान आता फक्ता दोनच हंडे पाणी घ्यायचं तिसरा हंडा पाणी घेणा-या महिलेला ग्रामपंचायतीकडून १०० रुपयांचा दंड लावलाय. यामुळे गावकऱ्यांना मात्र प्रचंड त्रास सहन करावं लागणार आहे. पाणी टंचाईत घोटभर पाण्यासाठी महिलांना शिक्षा देणारं गाव.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पडसुल गावात पाणी टंचाईने कहर केलाय. पाण्यासाठी दोन महिन्यापासून गावकऱ्यांचा अजब फतवा निघला. सात परस खोल विहिरीतुन पोटाला पिळा पडेल ऐवढ्या खोलुवरुन पाणी ओढायचं त्यातच दोनच हंडे पाणी घ्यायचं .तिसरा हंडा घेणाऱ्या महिलेला १०० रुपये दंड! त्यामुळे महिलांना आता पाणी पिण्यासाठीही पैसे मोजावे लागणार आहे. ही एक प्रकारची शिक्षाच आहे.

पाणी टंचाईच्या भीषण संकटात गावक-यांनी पाण्यावर निर्बंध लावलेत. हा प्रकार इथच न थांबता सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत पाण्यावर पहारा ठेवणारी ही अवस्था आहे. पाणी टंचाईमुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ग्रामपंचायत दंड सुरु केला खरा पण तीन धरणं असूनही पाणी का नाही? जलजीवन मिशन योजना तीन वर्षांपासून प्रलंबित आहे, आणि सरकार झोपेत आहे. अधिकाऱ्यांना कागदावरच योजना पूर्ण झाल्या दिसतात, पण प्रत्यक्षात तिसरी पिढी पाण्यासाठी डोंगरदऱ्यातून भटकतेय.

राजकारणी निवडणुकीत कोट्यावधी रुपयांच्या पाणी योजना केलेल्या आश्वासनांचा पाऊस पाडतात, पण गावकऱ्यांना पाण्याचा थेंबही मिळत नाही अन आता दंडाची शिक्षा महिलांना मिळतेय, पण खरा दोष कोणाचा असा प्रश्न या निमित्ताने महिला विचारत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT