Khed taluka Kadus 40 year old youth killed  Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात लेकीची छेड काढण्यावरुन कडाक्याचं भांडण, बापाच्या चेहऱ्यावर-डोक्यावर कोयत्यानं वार; घरचे पोहचतात तोवर...

Pune Khed Murder : काल मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही भयंकर घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Prashant Patil

पुणे : मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाशी झालेल्या वादातून एका ४० वर्षीय व्यक्तीवर कोयत्यानं हल्ला करून त्याचा खून करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील कडूस येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

संतोष बबन ढमाले (वय ४०) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती आहे. काल मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही भयंकर घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे कडूस परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत संतोष बबन ढमाले आणि त्यांचा मित्र अशोक झांबर गारगोटे हे चेतन बारमधून दारू पिऊन बाहेर पडले होते. यावेळी बारसमोर उभे असताना आरोपी किरण शिवाजी खंडागळे आणि प्रणय प्रमोद नवले (दोघेही राहणार कडूस येथील) यांच्याशी संतोष यांचा वाद झाला.

नेमकं प्रकरण असं आहे की, प्रणय याने संतोष यांच्या मुलीची छेड काढली होती. त्यामुळे हा वाद अधिक टोकाला गेला. वादाचं रुपांतर हिंसक हल्ल्यात झालं. दोन्ही आरोपींनी कोयत्यानं संतोष यांच्या डोक्यावर आणि तोंडावर वार केले, यामध्ये संतोष ढमाले हे गंभीर जखमी झाले. जखमी झालेले संतोष ढमाले रक्तभंबाळ होऊन जमिनीवर कोसळले. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून अशोक झांबर घाबरले आणि तिथून पळून गेले. ते संतोष यांच्या घरी गेले. कुटुंबीयांना याची माहिती दिली आणि कुटुंबीयांना घेऊन ते घटनास्थळी परतले. तेव्हा कुटुंबीयांना संतोष हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. कुटुंबीयांनी संतोष यांना तातडीने चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT