Ketan Agrawal murder, Lohagad murder case Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Exclusive : सिया-चेतनने ३१ मे पूर्वीच रचला डाव! केतन अग्रवाल हत्येच्या प्लॅनिंगची टाईमलाईन अखेर समोर, पाहा कट कसा शिजला?

Ketan Agrawal Lohagad death case timeline : लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल याच्या हत्येप्रकरणी कथित २० दिवसांच्या नियोजनाची टाईमलाईन समोर आली आहे. सिया आणि चेतन यांनी कसा रचला कट, जाणून घ्या

Akshay Badve

Ketan Agrawal Murder Timeline Explained: लोहगड किल्ल्याच्या दरीत ढकलून केलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा धक्कादायक कट आणि त्याची सविस्तर टाईमलाईन आता समोर आली आहे. ३१ मे ते १८ जून या अवघ्या २० दिवसांत आखलेला हा भयानक डाव आणि त्यामागील थरारक घटनाक्रमाने खळबळ उडाली आहे. सिया आणि चेतन यांनीच केतनची हत्या करण्यासाठी कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

केतनला संपवण्यासाठी पहिल्या ट्रिपपासून ते महाबळेश्वरच्या प्रवासादरम्यान घेतलेल्या तांत्रिक सरावापर्यंत अत्यंत शातीरपणे ही योजना आखली गेली होती. १४ जूनचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतरही हार न मानता, अखेर १८ जून रोजी लोहगडच्या दरीत ढकलून केतनची हत्या करण्यात आली.

केतन अग्रवाल हत्येची 'टाईमलाईन'

३१ मे (पहिली रेकी व ठिकाण निश्चिती):

केतन आणि सिया पहिल्यांदा लोहगडावर गेले. खरे तर याच दिवशी त्याला संपवण्याचा प्लॅन होता; मात्र किल्ल्याच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज न आल्याने आणि 'नो रिस्क' धोरणामुळे हा प्रयत्न टळला. या दिवशी केवळ जागेची रेकी करून ठिकाण फायनल करण्यात आले.

३ जून (पासपोर्ट फाडून ट्रिप रद्द):

४ जून रोजी केतन आणि सिया प्री-वेडिंग शूटसाठी बाली (इंडोनेशिया) येथे जाणार होते. मात्र, सियाची जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. मुंबईला जाताना सियाने केतनचा पासपोर्ट फाडून टाकला, ज्यामुळे बालीची ट्रिप रद्द झाली.

१४ जून (पहिला अयशस्वी प्रयत्न):

बालीला न जाता पुन्हा लोहगडला जाण्याचा हट्ट सियाने धरला. गडावर असताना सियाने केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवाने केतन थोडक्यात वाचला.

१५ ते १७ जून (टेकडीवर हत्येचा सराव):

१४ जूनचा प्लॅन फसल्यानंतर सिया आणि चेतनने पुण्यातील'एरिया ३७' येथील टेकडीवर जाऊन सराव केला. केतनला दरीत ढकलण्यासाठी किती ताकदीने धक्का द्यावा लागेल, यावर दोघांनी सखोल अभ्यास केला.

१८ जून (अखेर हत्येचा डाव यशस्वी):

१८ जून रोजी महाबळेश्वर येथे सियाच्या वाढदिवसाचे आयोजन केतनने केले होते. मात्र, तेथे जाण्यापूर्वी पुन्हा लोहगडावर जाण्याचा हट्ट सियाने धरला. गडावर पोहोचताच चेतनच्या मदतीने पूर्वश्रुत योजनेनुसार केतनला दरीत ढकलून देऊन ही क्रूर हत्या घडवून आणली.

स्लो पॉयझनचाही केला होता विचार

लोहगडसोडून सिया आणि चेतन यांनी इतर ठिकाणाची पाहणी केल्याचेही तपासात समोर आले आहे. केतनची हत्या करण्यासाठी लोणावळ्यातील अनेक ठिकाणांबद्दल दोघांनी माहिती मिळवली होती. लोणावळा मधील टायगर पॉईंट, विसापूर किल्ल्याबाबत दोघांनी चर्चा केली होती. केतनला संपवण्यासाठी "स्लो पॉयझन" बद्दल सुद्धा पर्यायबद्दल दोघांनी विचार केला होता.

सिया चेतन यांचा प्लानिंग काय ?

केतनची हत्या करण्यासाठी शास्त्राचा वापर न करण्याचा सिया आणि चेतन यांनी निर्णय घेतला होता. हत्यारांचा किंवा शस्त्रांचा वापर केल्यास हत्या केल्याचा संशय तपास यंत्रणांना येणार याची सिया आणि चेतन यांना कल्पना होती. आपल्या विरोधात पुरावे मिळू द्यायचे नाही याची देखील दोघांनी घेतली काळजी घेतले होते. हत्या नाही अपघातामध्येच केतनचा मृत्यू झाला असचं दाखवण्यासाठी सिया आणि चेतन यांनी प्लॅनिंग केले होते. अपघात घडवून केतन ची हत्या कशी केली जाऊ शकते, याबाबत चेतन आणि सियाने पर्याय शोधले होते, हे तपासातून समोर आल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT