KETAN AGRAWAL MURDER CASE: VIRAL BIRTHDAY VIDEO OF SIYA GOYAL SPARKS FRESH QUESTIONS Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक अपडेट, लोहगड दुर्घटनेआधीचा रोमँटिक व्हिडिओ आला समोर

Pune Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. सिया गोयलसोबतचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Alisha Khedekar

  • पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणाला नवे वळण

  • या प्रकरणात होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक

  • सियाच्या वाढदिवसाचा केतनसोबतचा जुना व्हिडिओ व्हायरल

  • सियाची मृत्यूनंतरची भावनिक सोशल मीडिया पोस्टही व्हायरल

पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून नियोजित हत्याकांड असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित बॉयफ्रेंड चेतन यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान केतनच्या मृत्यूपूर्वीचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये तो सियासोबत आनंदाने वाढदिवस साजरा करताना पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी सकाळी सिया आणि केतन लोहगड किल्ल्यावर गेले होते. यावेळी केतन सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर सियाने पोलिसांना दिलेल्या माहितीत केतनचा पाय घसरल्याने तो दरीत पडल्याचा दावा केला होता. मात्र तपासादरम्यान अनेक संशयास्पद बाबी समोर आल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आणि ही नियोजित हत्या असल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर सिया आणि केतन यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ विशेष चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ १८ मे रोजीचा असून सियाच्या वाढदिवसानिमित्त केतनने तिच्यासाठी खास सरप्राईजचे आयोजन केले होते. व्हिडीओमध्ये केतन सियाला फुले देताना, तिच्यासाठी विशेष सजावट करताना आणि रेस्टॉरंटमध्ये वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. दोघांमधील प्रेम आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे.

केतनच्या मृत्यूनंतर सियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर भावनिक पोस्टही शेअर केली होती. "तू मला माझ्या वाढदिवशीच सोडून गेलास. आपल्या लग्नाला काहीच महिने उरले होते," असे तिने त्या पोस्टमध्ये लिहिले होते. मात्र आता तपासातून समोर आलेल्या माहितीनंतर या पोस्टकडेही संशयाच्या नजरेतून पाहिले जात आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून पोलिसांकडून अधिक पुरावे गोळा केले जात आहेत. त्यामुळे पुढील काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद

Ladki Bahin Yojana: जून संपायला अवघे ६ दिवस बाकी; लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी काय खावे? आणि काय खाऊ नये? वाचा पूर्ण लिस्ट

Taila Baila Fort : ३,३२२ फूट उंचीवरून शत्रूंवर नजर ठेवणारा 'तैलबैला' किल्ला पाहिलाय का? मुंबईपासून आहे जवळ

Veen Doghantali Hi Tutena : समरची एक चूक पडणार महागात; सुश्मिताला दिला घरातील मोठा हक्क, स्वानंदी पाहतच राहिली | VIDEO

SCROLL FOR NEXT